सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाच्यावतीने उमेदवार देण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (ता. २९) दुपारी ४ वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदार संघातील ही बैठक होत आहे. या बैठकीला मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहर येथील मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला सोलापूर लोकसभा मतदार संघातील इतर समाजाच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर सोलापूर लोकसभा मतदार संघातील अहवाल शनिवारी (ता.३०) मनोज जरांगे पाटील यांना सादर केला जाणार आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी कोणत्या नावांची चर्चा होते. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे कोणत्या नावावर एकमत होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात भाजपने आमदार राम सातपुते यांना तर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून जवळपास दहा ते बाराजण इच्छुक होते. या इच्छुकापैकी कोणत्या एका नावावर एकमत होते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.