Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्राचारार्थ मोदींनी सभा घेतली.
PM Modi In Uttarakhand Rally
PM Modi In Uttarakhand RallyEsakal

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याणमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी तरुणांना महत्वाचं आवाहन केलं. सरकार आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांचं आपलं व्हिजन तयार असून त्यात आपण २५ दिवस वाढवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. (modi rally in kalyan will extend 25 days in first 100 days vision modi appealed to youth)

PM Modi In Uttarakhand Rally
CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्राचारार्थ मोदींनी सभा घेतली. यावेळी त्यांनी तरुणाईला एक आवाहन केलं. मोदी म्हणाले, पुन्हा सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन आहे. ते आता मी १२५ दिवस करणार आहे. कारण माझ्या देशातील नवमतदारांनी मला त्यांच्या मनातील गोष्टी सांगाव्यात त्या गोष्टींचा मी या २५ दिवसांमध्ये समावेश करणार आहे.

PM Modi In Uttarakhand Rally
Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

काँग्रेस फक्त हिंदु-मुस्लिम असं करतंय

यावेळी मोदींनी उपस्थितांनाही आवाहन केलं की, तुमचा संकल्प हे माझं स्वप्न आहे. तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी माझा प्रत्येक क्षण तुमच्या आणि देशाच्या नावे समर्पित आहे. पुढे काँग्रेवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेस कधीही विकासाचं काम करु शकत नाही. काँग्रेस केवळ हिंदू-मुस्लिम करत आहे. मोदी आता त्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com