Priyanka Gandhi : राहुलविरोधात भाजपची संपूर्ण यंत्रणा : प्रियांका

‘‘राहुल गांधी यांच्याविरोधात खोटे पसरविण्यासाठी भाजपने त्यांची यंत्रणा कामाला लावली. भाजपचे नेते जाती, धर्म, मंदिर-मशीद याबाबत बोलतील; पण जनतेसमोरील प्रश्‍नांवर बोलणार नाहीत,’’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal

रायबरेली : ‘‘राहुल गांधी यांच्याविरोधात खोटे पसरविण्यासाठी भाजपने त्यांची यंत्रणा कामाला लावली. भाजपचे नेते जाती, धर्म, मंदिर-मशीद याबाबत बोलतील; पण जनतेसमोरील प्रश्‍नांवर बोलणार नाहीत,’’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केली.

रायबरेली येथून राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा प्रचार करण्यासाठी प्रियांका यांनी आज सभा घेतली. त्या म्हणाल्या,‘‘रायबरेलीची जनता आपल्या नेत्यांना चांगले ओळखते. त्यांना इंदिरा गांधींची काही धोरण आवडली नव्हती तर त्यांनी इंदिराजींनाही पराभूत केले होते. पराभवामुळे इंदिरा गांधी चिडल्या नाहीत, तर त्यांनी आत्मपरिक्षण केले. पुढील निवडणुकीत रायबरेलीच्या जनतेने त्यांना निवडून दिले.

जनतेचे हेच वैशिष्ट्य आहे.’’ राहुल गांधी यांच्याविरोधात खोटा प्रचार करण्यासाठी भाजपने त्यांची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे, मात्र येथील जनतेला आपला नेता बरोबर ओळखता येतो, असेही प्रियांका यांनी सांगितले.

भाजपला राज्यघटनेत बदल करण्याची इच्छा होती, मात्र त्यामुळे निवडणुकीत पराभव होऊ शकतो असे लक्षात आल्याने आता ते ‘अशी काही योजना नव्हती’ असे सांगत आहेत, असा दावाही प्रियांका गांधी यांनी केला.

Priyanka Gandhi
Narendra Modi : ....हा अवमान देश सहन करणार नाही ; पित्रोदांच्या वांशिक टिपणीवरून मोदींचा घणाघात

जनतेला बदल हवा आहे. सातत्याने फसविले जाण्याचा त्यांना कंटाळा आला आहे. माध्यमे आणि राजकीय व्यासपीठांवर ज्या पातळीची चर्चा होत आहे, त्याचा उबग आला आहे. आपल्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. सरकारने बेरोजगारी हटविण्यासाठी काय केले, महागाई कमी करण्यासाठी काय केले, याची उत्तरे जनतेला हवी आहेत. मोदींनी या मुद्द्यांवर बोलावे.

- प्रियांका गांधी, काँग्रेसच्या नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com