
पुणे : मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त मतदार या जिल्ह्यात आहेत, तर नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
लोकसभेसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील सुमारे सव्वानऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ८२ लाख ८२ हजार ३६३ एवढी आहे. मुंबई उपनगराची एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार ५९६ इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार ५८८, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ४८ लाख ८ हजार ४९९ इतकी आहे. नागपूरची एकूण मतदार संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ इतकी आहे.
रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या १३ लाख ३ हजार ९३९ असून, त्यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार १२ आहे. महिला मतदारांची संख्या ६ लाख ७२ हजार ९१६ इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या १२ लाख ७६ हजार ९४१ असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३७ हजार ६०९ इतकी आहे. महिला मतदारांची संख्या ६ लाख ३९ हजार ३२० इतकी आहे.
तृतीयपंथी मतदारांची संख्या १२ इतकी आहे. गोदिंया जिल्ह्यातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या १० लाख ९२ हजार ५४६ असून पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ४१ हजार २७२ आहे, तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ५१ हजार २६४ इतकी आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या १० इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या ६ लाख ६२ हजार ७४५ असून पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३० हजार ७१९ आहे. तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३२ हजार २५ इतकी आहे. राज्यात
८ एप्रिलपर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद आहे. यात ४ कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष मतदार, तर ४ कोटी ४४ लाख ४ हजार ५५१ महिला मतदार आणि ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत.
पाच जिल्ह्यांत अधिक मतदार
अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये ३६ लाख ४७ हजार २५२ मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३६ लाख ४७ हजार १४१ मतदार आहेत. जळगावमध्ये ३५ लाख २२ हजार २८९ मतदार आहेत. कोल्हापूरमध्ये ३१ लाख ७२ हजार ७९७ मतदार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० लाख ४८ हजार ४४५ मतदार आहेत. बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांत २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.