Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे.
Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. ४) जाहीर होत असताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पेढे, लाडूची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ढोलीबाजा, डीजे लावला जाणार असून, मोठ्याप्रमाणात गुलालाची खरेदीही करण्यात आली आहे. (Pune Lok sabha lot of excitment in BJP Congress full orders of Pedha Ladoo and Gulal)

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर
Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकू असा विश्‍वास व्यक्त केला आहे. शहरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निकाला आधीच खासदारपदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देणारे फलक लावून गुलाल उधळला आहे.

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर
Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर १० नंतर निवडणुकीचा कल येण्यास सुरुवात होणार आहे. भाजपतर्फे चौकाचौकात टीव्ही, एलइडी स्क्रीन लावून निवडणूक निकाल बघण्याची व्यवस्था केली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा दावा करत ३७० किलो पेढ्यांच्या वाटपाची तयारी केली आहे.

त्याचप्रमाणे ४०० किलो लाडू, पेढे, डीजेची व्यवस्था केली आहे. महायुतीतर्फे टिळक चौकात सायंकाळी चार वाजता जल्लोष केला जाईल. त्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष केला जाणार असून, रात्री मुरलीधर मोहोळ हे कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत, असे दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर
Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धंगेकर यांच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले,‘‘काँग्रेस भवन येथे विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जाणार आहे. त्यावेळी गुलाल उधळला जाईल, पेढे वाटले जाणार आहेत. तसेच सहा विधानसभा मतदारसंघात, प्रत्येक प्रभागात आनंदोत्सव साजरा केला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे तयारी सुरु केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com