Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी जाहीर होत आहे. तत्पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसतं आहे.
devendra Fadnavis wanted to be finance minister Uddhav Thackeray explosion
devendra Fadnavis wanted to be finance minister Uddhav Thackeray explosionSakal

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी जाहीर होत आहे. तत्पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीनं शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना फोन करुन भेटीची वेळ मागितल्याचं कळतंय.

महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनीच हा फोन केल्याचं सांगितलं जात होतं, पण आपण हा फोन केला नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. पण शिवसेनेच्या एका नेत्यानं असा फोन आल्याचं ट्विट केल्यानं या सर्व चर्चेला सुरुवात झाली आहे. (Prasad Lad coordinator mahayuti and close person to Devendra Fadnavis asked for time to meet Uddhav Thackeray)

devendra Fadnavis wanted to be finance minister Uddhav Thackeray explosion
Lok Sabha World Record: "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बनला वर्ल्ड रेकॉर्ड"; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आश्चर्याचा धक्का

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, प्रसाद लाड यांनी आपण फोन केल्याचं वृत्त फेटाळतं असले तरी त्यांनी असा फोन करुन ठाकरेंकडं उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भेटण्याची वेळ मागितल्याचं खात्रीलायक सुत्रांकडून माहिती मिळाल्याचं साम टीव्हीनं म्हटलं आहे. पण महायुतीला ३८ पेक्षा अधिक जागा मिळतील त्यानंतर ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन 'गेट वेल सून' म्हणायचं असा प्लॅनही त्यांनी केल्याचं साम टीव्ही आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

devendra Fadnavis wanted to be finance minister Uddhav Thackeray explosion
Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

प्रसाद लाड यांनी काय म्हटलं?

लाड म्हणतात, ही बातमी फेक आहे, कोणीतरी हा प्रकार घडवून आणला आहे. आम्हाला फोन करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला ठाकरेंकडूनही कोणी संपर्क केलेला नाही, असं लाड यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंचा भाजपवर आरोप

ज्या अर्थी भाजपचे लोक तातडीनं आम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरुन उद्याच्या निकालात आमच्यासाठी मोठा शुभसंकेत असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. त्या पुढे म्हणाल्या, भाजपकडून कोण येणार आहे किंवा नाही, या कंड्या पिकवण्याचं काम भाजपकडून सुरु आहे.

भाजपकडून जरी ही संभ्रमाची अवस्था निर्माण केली जात असली तरी आम्ही अशा कुठल्याही गोष्टीला थारा देत नाही. तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशी कुठलीही कृती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होणार नाही. तसेच भाजपा सत्तेसाठी कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं पण त्या पातळीवर आपण पोहोचायचं की नाही हे आम्ही ठरवून घेतलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com