Rahul Gandhi : जातिनिहाय जनगणनेतून देशाचा ‘एक्स रे’ करू ; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

भाजप टेंपोवाल्या अब्जपतींकडून मिळालेल्या नोटा मोजण्यात गुंतला आहे. मात्र, आपला पक्ष जातीनिहाय जनगणनेतून देशाचा ‘एक्स रे’ करेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

नवी दिल्ली : भाजप टेंपोवाल्या अब्जपतींकडून मिळालेल्या नोटा मोजण्यात गुंतला आहे. मात्र, आपला पक्ष जातीनिहाय जनगणनेतून देशाचा ‘एक्स रे’ करेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. काँग्रेसला उद्योगपती अदानी व अंबानी यांच्याकडून रोकड मिळत असल्याचे वक्तव्य मोदी यांनी केले होते.

‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की गेल्या दहा वर्षांपासून ते (भाजप) टेंपोवाल्या अब्जपतींकडून मिळालेल्या नोटा मोजत आहेत. आम्ही मात्र जातीनिहाय जनगणनेतून देशाचा ‘एक्स रे’ करू आणि समाजातील प्रत्येक घटकाला समान वाटा मिळवून देऊ. त्यांनी या वेळी जातीनिहाय जनगणनेबाबतची काँग्रेसची जाहिरातही आपल्या या पोस्टसोबत शेअर केली.

अदानी, अंबानी या उद्योगपतींनी आम्हाला काळा पैसा पाठविला आहे का, याची ‘सीबीआय’ व ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, असे आवाहनही राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे, सामाजिक-आर्थिक जनगणनेवरील आपले मत पंतप्रधान मोदी यांनी मांडावे, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com