Raigad Loksabha : तटकरेंसमोर मित्र पक्षांचं आव्हान; निवृत्तीनंतर पुन्हा राजकीय आखाड्यात उतरलेल्या गितेंना समाजबांधवांचाच विरोध

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भूतकाळात केलेल्या चुका आता अडचणीच्या ठरू लागल्या आहेत.
Raigad LokSabha Constituency
Raigad LokSabha Constituencyesakal
Summary

आपली राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बरोबर भाजपप्रणित महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

अलिबाग : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भूतकाळात केलेल्या चुका आता अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. जिल्ह्यात राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी मदत करणाऱ्यांना त्यांनी नेहमी अडचणीत टाकले, अशी टीका तटकरेंच्या बाबतीत सतत केली जाते. पेणचे आमदार रविशेठ पाटील, महाडचे आमदार भरत गोगावले, दापोलीचे आमदार योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम (Ramdas Kadam), अशी खूप मोठी यादी तटकरेंवर नाराज असणाऱ्यांची आहे.

सध्या हे सर्वजण महायुतीमध्ये (Mahayuti) असल्याने त्यांच्या मदतीने आपण बहुमताने रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) विजयी होऊ, असा दावा तटकरे करीत असले तरी, यासाठी या मित्रांना बरोबर घेऊन काम करण्याचे भले मोठे आव्हान तटकरेंसमोर उभे आहे. त्याच वेळेला तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे अनंत गिते राजकारणातली आपला प्रदीर्घ अनुभव आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन निवृत्तीनंतर पुन्हा राजकीय आखाड्यात उतरले आहेत.

Raigad LokSabha Constituency
Hatkanangle Loksabha : हातकणंगलेत राजू शेट्टींना 'मविआ'चा पाठिंबा? उद्या घोषणेची शक्‍यता, मुंबई-दिल्लीत घडामोडींना वेग

सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या गिते यांना मागील निवडणुकीत तटकरे यांनी ३१,४३८ मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यावेळेस जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा शेतकरी कामगार पक्ष हा तटकरे यांच्या बाजूने होता, मात्र शेकापच्या जयंत पाटील यांनी आता तटकरेंची साथ सोडून अनंत गितेंना साथ दिली आहे, इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या सारख्या पक्षांची मोट बांधून ठाकरे गट पुन्हा रायगडची जागा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.

यासाठीची मोर्चेबांधणी गितेंनी दोन-तीन वर्षांपूर्वीपासूनच केली आहे, तर आपली राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बरोबर भाजपप्रणित महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील आणि गुहागरचे भास्कर जाधव यांच्या व्यतिरिक्त सर्वच नेते महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे आपला लोकसभा निवडणुकीत विजय सहज होईल, असा तटकरेंचा विश्वास भाजपमध्ये नव्यानेच दाखल झालेले पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी फोडला. पाटील यांनी भाजपकडून या मतदारसंघातून खासदारकीसाठी दावा करताना तटकरेंच्या कारभारावर सडकून टीका केली.

Raigad LokSabha Constituency
राष्ट्रवादीच्या होम पिचवर शरद पवारांचीच कसोटी; साताऱ्याच्या उमेदवारीवरुन मोठा पेच, श्रीनिवास पाटील-सारंग पाटलांना विरोध!

जाहीर सभांमध्ये धैर्यशील पाटील आणि पेणचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनीही तटकरेंना विरोध केला. तरीही तटकरे तिकिटासाठी आग्रही आहेत. त्यांनी आपला हट्ट अद्याप सोडलेला नाही. मात्र, निर्णायक विजयासाठी त्यांना या सर्व मित्र पक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. रायगड मतदारसंघातील निवडणूक सुनील तटकरे विरुद्ध अनंत गिते यांच्यात दुहेरी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. तिसऱ्या उमेदरांचे अद्याप या लढतीमध्ये अस्थित्व दिसून येत नाही. २०१९ च्या पराभवानंतर गितेंनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला; परंतु त्यांना पूर्वीप्रमाणे मतदारसंघावरील पकड निर्माण करता आली नाही.

Raigad LokSabha Constituency
रणजितसिंहांच्या उमेदवारीला रामराजेंचा विरोध; माढा मतदारसंघाचा तिढा कायम, अजितदादा-फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाहीच!

‘कुणबी पॅटर्न’च्या बळावर यश; पण...

कुणबी पॅटर्नच्या बळावर गितेंना पूर्वीच्या रत्नागिरी मतदारसंघातून ४ वेळा व आताच्या रायगड मतदारसंघातून २ वेळा विजय मिळवता आलाय; परंतु हेच कुणबी मतदार मागील ३० वर्षांत आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारू लागले आहेत. दापोली, गुहागर, महाड, श्रीवर्धन या मतदारसंघात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येथील नागरी सुविधा व रोजगाराच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात कुणबी समाजातील तरुणांनी स्थलांतर केले आहे. विकासाचा आलेख विरुद्ध दिशेने घसरण्यास येथील केंद्रीय नेतृत्वही तितकेच कारणीभूत असल्याचे समजले जाते. या सर्व अडचणींवर मात करत आपल्याच समाज बांधवांचे रुसवे दूर करण्याचा प्रयत्न गिते करीत आहेत; मात्र सद्याच्या स्थितीत तसे काहीही होत नसल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com