Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatanaesakal

Hatkanangle Loksabha : हातकणंगलेत राजू शेट्टींना 'मविआ'चा पाठिंबा? उद्या घोषणेची शक्‍यता, मुंबई-दिल्लीत घडामोडींना वेग

हातकणंगलेत तिरंगी लढत झाल्यास महायुतीचा पराभव अशक्य आहे, याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाली आहे.
Summary

काँग्रेसने शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे. हीच भूमिका राष्ट्रवादी पवार गटाची आहे.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency) अखेर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. याची अधिकृत घोषणा गुरुवारी (ता. २१) होण्याची शक्‍यता आहे. यासाठीची चर्चा शनिवारी (ता. १६) मुंबईत आणि काल दिल्लीत झाली आहे.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Sangli Loksabha : 'शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल'; विश्‍वजित कदमांचा थेट इशारा

शेट्टी यांनी २०१९ ची निवडणूक आघाडीसोबत लढवली होती; पण मतभेदानंतर त्यांनी २०२२ मध्ये आघाडीसोबत काडीमोड घेतला. तेव्हापासून त्यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला होता. ते आजही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘मी कोणाच्याही दारात पाठिंब्यासाठी जाणार नाही. माझी भूमिका ज्यांना पटेल त्यांनी मला पाठिंबा द्यावा,’ अशी भूमिका शेट्टी यांनी कायम ठेवली आहे.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Loksabha Election : 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना 'माविआ' घेणार नाही; टीका करत काय म्हणाले आठवले?

दुसरीकडे हातकणंगलेत तिरंगी लढत झाल्यास महायुतीचा पराभव अशक्य आहे, याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाली आहे. त्यातही काँग्रेसचे कोल्हापूर आणि सांगलीतील नेते शेट्टी आघाडीत येत नसतील, तर त्यांना पाठिंबा द्यावा या मानसिकतेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेली दोन दिवस महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही निवडक जागांवर खलबते सुरू आहेत.

त्यात हातकणंगलेचाही समावेश आहे. ही जागा आम्हाला मिळावी आणि राजू शेट्टींनी लढावे, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे. मात्र, त्याला शेट्टी तयार नाहीत. दुसरीकडे काँग्रेसने शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे. हीच भूमिका राष्ट्रवादी पवार गटाची आहे. सद्यःस्थितीत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांत तुल्यबळ असा उमेदवार नाही. त्यामुळे आघाडीसमोर शेट्टी यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Sangli Loksabha : 'आमचाच आमदार अन्‌ खासदार’ सूत्र यंदाही जमणार की बिघडणार? संजय पाटील तिसऱ्यांदा 'लोकसभे'साठी सज्ज

काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा

शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडसोबत राज्यातील काही कॉंग्रेस नेत्यांनी चर्चा केली. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील आदींचा समावेश आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचा शेट्टी यांना पाठिंबा दिल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com