Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway

Raigad Loksabha Election: "चड्डीतून फुलपॅन्टमध्ये आलो पण..." मुंबई-गोवा महामार्गावरुन मतदार आक्रमक!

सन 2011 पासून या महामार्गाचं काम सुरु आहे, पण अद्याप हा रस्ता पूर्ण झालेला नाही.

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोर धरु लागला आहे. खड्ड्यांमध्ये लपलेल्या या महामार्गामुळं राज ठाकरेंची मनसेही आक्रमक झाली होती. पण आता राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं हा मुद्दा देखील शांत झाला. पण आता इथला मतदार मात्र आक्रमक झाला आहे. सन 2011 पासून या महामार्गाचं काम सुरु आहे. पण रस्ता पूर्ण झालेला नाही. (Raigad Loksabha Election 2024 Mumbai Goa highway was not ready till date aggressive errupted in voters of Mangaon)

Mumbai-Goa Highway
Vinod Patil: विनोद पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये झाली 40 मिनिटं चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 15 वर्षांपासून बांधला जात असला तरी त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. बांधकामादरम्यान या खड्डेमय महामार्गावर 6 हजारांहून अधिक अपघात झाले असून, त्यात 1,500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2012 ते 2022 दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते अपघातात 1,500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. राजकीय उदासिनतेमुळं हा रस्ता रखडल्याचे मतदारांनी सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर डागडुजी होते, परत काम बंद होतं, असं देखील काही मतदारांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

Mumbai-Goa Highway
Ethanol Production: इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली; सरकारच्या निर्णयामुळं साखर कारखान्यांना मोठा दिलासा

"आत्ताच्या निवडणुकीत हे नेते आणि मंत्री कोण कधी जातोय कुठे हेच कळत नाही. मी हाफ चड्डीवरुन फुलपँटीत आलो तरी हा हायवे तयार झालेला नाही. त्यामुळं कोणाला मत द्यायचं हेच कळत नाही. कुणाला मत द्यायचं हेच कळत नाही. मला मत द्यायचं आहे पण रात्री तळ्यात तर उद्या मळ्यात अशी नेते मंडळींची अवस्था आहे," असं एका माणगवातील नागरिकानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

तर "मुंबई-गोवा रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, हा प्रश्न खूपच रखडला आहे, अशी प्रतिक्रियाही एका नागरिकानं दिली आहे. तर आम्हाला चोवीस तास पाणी मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त करताना माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्यानं रेल्वे गाड्या इथं थांबण्याची व्यवस्था येणाऱ्या खासदारांनी करावं" अशी अपेक्षा एकानं व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com