Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : 192 ज्येष्ठांनी गमावला मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करण्याचा अधिकारी निवडणूक विभागाने दिला आहे.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabhaesakal
Summary

पोलिस कर्मचारी, चालक आदी ३०७ कर्मचारी असून त्यापैकी ३१४ जणांनी मतदान केले. ६२ टक्के हे मतदान झाले असून, १९४ कर्मचारी शिल्लक आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातील ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करण्याचा अधिकारी निवडणूक विभागाने दिला आहे. त्यामध्ये सहमती मिळालेल्या २ हजार ६७३ मतदारांपैकी २ हजार ४९३ मतदारांनी मतदान केले. ९४ टक्के हे मतदान (Voting) झाले आहे. उर्वरित १८० मतदारांच्या घरी निवडणूक विभागाची टीम दोन वेळा जाऊनही ते उपलब्ध होऊ शकलले नाहीत. त्यामुळे या मतदारांनी आता मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. १२ दिव्यांग मतदारांनाही याचा फटका बसला आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील पोस्टल मतदान १ हजार ०३४ आहे. यामध्ये सर्व नोकरदार वर्ग आहे. त्यापैकी ६० जणांनी मतदान केले आहे. त्यांना ४ तारखेपर्यंत मतदान करण्याचा अधिकार होता. ५.८ टक्के हे मतदान झाले आहे. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांना घर बसल्या मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सहमती घेण्यात आली आहे.

२ हजार ६७३ मतदारांनी यासाठी सहमती दर्शवली. त्यासाठी दोन वेळा निवडणूक विभागाची टीमने घरी जाऊन मतदान करून घेतले. यातील २ हजार ४९३ मतदारांनी मतदान केले. ९४ टक्के हे मतदान झाले. उर्वरित १८० मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे त्यांनी आता मतदान करण्याचा अधिकार गमावला आहे. दिव्यांग मतदारांनी देखील घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडला होता. ४०० मतदारांनी त्यासाठी सहमती दर्शवली. ३८८ जणांनी मतदान केले. १२ जणांनी मतदान केले नाही. त्यांनीही आता मतदान करता येणार नाही.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : 'सहकारा'च्या व्होट बॅंकेत मतदान होणार बिनधास्त; नेत्यांकडून कोणताही निरोप नाही

पोलिस कर्मचारी, चालक आदी ३०७ कर्मचारी असून त्यापैकी ३१४ जणांनी मतदान केले. ६२ टक्के हे मतदान झाले असून, १९४ कर्मचारी शिल्लक आहे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या ६ हजार ६४५ कर्मचाऱ्यापैकी ४ हजार ६५५ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. १९९० कर्मचारी शिल्लक आहेत. ७१ टक्के हे मतदान झाले. एकूण ११ हजार २५९ पोस्टल मतदारांपैकी ७ हजार ९०९ मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com