Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियातून एकामागून एक व्हिडिओ शेअर करत मतदानादरम्यान सुरु असलेल्या कथित गैरप्रकार उघड केले आहेत.
ajit pawar on rohit pawar
ajit pawar on rohit pawaresakal

Ajit Pawar speaks on Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियातून एकामागून एक व्हिडिओ शेअर करत मतदानादरम्यान सुरु असलेल्या कथित गैरप्रकार उघड केले आहेत. या व्हिडिओजवर अखेर अजित पवार बोलले आहेत. (Rohit Pawar is social media manager I recognise him since childhood Ajit Pawar target on Viral Video)

ajit pawar on rohit pawar
Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

अजित पवार म्हणाले, "मी आज बघितलं की काही ठिकाणी तर महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं पण धाराशिवमध्ये चाकून भोकसल्याची घटना घडली. काही ठिकाणी मतदाराच्या ठिकाणी एखादी व्यक्ती दगावली अशा घटना घडल्या हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे. याकडं कोण कार्यकर्ते आहेत याकडं बारकाईनं पाहिलं पाहिजे. माझ्या ३५ वर्षांच्या कालावधीत कधी असं पहायला मिळालेलं नाही" (Latest Marathi News)

ajit pawar on rohit pawar
Women Agitation on Voting Date: मतदानाच्या दिवशीच महिलांचं धरणं आंदोलन; व्यक्त केला संताप, मतदानावर बहिष्कार

रोहित पवारांवर सोडलं टीकास्त्र

मी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पक्षात आहे. रोहित तेव्हा आमच्या पक्षात होता आता तो दुसऱ्या पक्षात गेला आहे. आमच्या पक्षात घड्याळाकडं असतानाही त्याची सोशल मीडिया टीम चांगली होती. त्याला पहिल्यापासून कामापेक्षा सोशल मीडियात इंटरेस्ट आहे. आम्ही मात्र कामावर भर देतो. अलिकडच्या पिढीतला असल्यानं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे चांगलं कळतं. (Marathi Tajya Batmya)

ajit pawar on rohit pawar
Women Agitation on Voting Date: मतदानाच्या दिवशीच महिलांचं धरणं आंदोलन; व्यक्त केला संताप, मतदानावर बहिष्कार

तो खूपच पोहोचलेला आहे

दरम्यान, माझ्या कानावर दोन-तीन गोष्टी आल्या यामध्ये वेल्हा तालुक्यातील पुणे जिल्हा सहकारी बँकेबाबत त्यानं काही आरोप केले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणं बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असतात. जेव्हा त्यानं आरोप केला त्यावेळचं सीसीटीव्ही चेक करावं. (Latest Maharashtra News)

रोहित सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे की त्यातून तो दृश्ये काल-परवाचीच आहेत हे दाखवायलाही मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळं त्याला सध्या काही उद्योग नाही. माझ्याबद्दल वेडंवाकडं बोलणं आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हेच त्याच सध्या काम सुरु आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

ajit pawar on rohit pawar
Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

नौटंकी करतो त्याला मी लहानपणापासून ओळखतो

त्याचबरोबर भोरमध्ये कारमध्ये पैसे सापडल्याचंही रोहितनं सोशल मीडियावर सांगितलं. पण निवडणूक आयोगानं, पोलीस यंत्रणांनी याची चौकशी करावी. वेगवेगळ्या माध्यमातून गैरसमज पररवणं, सतत ट्वीट करणं. शेवटच्या सभेत त्यानं कशी नौटंकी केली होती हे आपण पाहिलं मी त्याला लहानपणापासून ओळखतो. मला आता त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com