Sangli Lok Sabha : 'मशाल' पेलायला 'हात' मिळणार का? विशाल पाटलांच्या बंडखोरीने शिवसेना चिंतेत

आमदार विश्‍वजित कदम यांनी काँग्रेस एकसंध करत विशाल यांचे नेतृत्व केले.
Sangli Lok Sabha Congress
Sangli Lok Sabha Congressesakal
Summary

चंद्रहार पाटलांना बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांचे चिन्ह मिळाले खरे, मात्र सांगलीतील बाळासाहेब कदमांचे आता सहाय्य लागणार आहे.

सांगली : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धक्कातंत्र वापरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघ आपल्या पदरात पाडू घेतला. खरं तर खेचून आणला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे लोकसभा लढण्याचे स्वप्न साकार झाले, मात्र त्यांच्या प्रचाराला अद्याप गती मिळालेली नाही. त्यांना ‘मशाल’ पेलायला काँग्रेसचा ‘हात’ मिळणार का, हा खरा प्रश्‍न आहे आणि त्याचे उत्तर उद्या (ता. २५) काँग्रेसच्या (Congress) मेळाव्यात मिळण्याची अपेक्षा आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगलीत येत आहेत. आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या जाणार आहेत. सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसची दिशा काय असावी, यावर मंथन होणार आहे.

Sangli Lok Sabha Congress
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात शाहू महाराजांना MIM चा पाठिंबा; 'मविआ'ने पत्रकाद्वारे स्पष्ट केली भूमिका, काय म्हटलंय पत्रकात?

एकीकडे, विशाल पाटील यांची बंडखोरी आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा धर्मपालनाचा तिढा आहे. विशाल पाटील म्हणत आहेत, ‘हे काँग्रेसचेच बंड आहे.’ दुसरीकडे, शिवसेना विशाल पाटलांवर कारवाईसाठी आणि काँग्रेसने प्रचारात सहभागी व्हावे, यासाठी अडून बसली आहे. या स्थितीत काँग्रेसला निर्णय करावा लागणार आहे. दोन्ही निर्णय कठीण आहेत. प्रदेशनेत्यांना देश आणि राज्य पातळीवरचा विचार करावा लागेल, अशी भूमिका याआधी मांडली गेली आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर नेते काय निर्णय घेतात आणि तो कार्यकर्ते मान्य करतात का, यावर शिवसेनेच्या प्रचाराची दशा आणि दिशा ठरणार आहे.

Sangli Lok Sabha Congress
Kolhapur Lok Sabha : शाहू महाराजांविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर नेते बाजीराव खाडे 6 वर्षांसाठी निलंबित

चंद्रहार पाटील सध्या जिल्ह्यातील तालुके, गावे पिंजून काढत आहेत. त्यांच्या समवेत शिवसेनेतील सर्व पदाधिकारी आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची त्यांना कमतरता जाणवत आहे. जिल्ह्यात सहाशे गावे आहेत. एक महापालिका आणि विटा, तासागावसारखी मोठी शहरे, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जतसारखी आव्हानात्मक शहरे आहेत. केवळ ३०० तास बाकी आहेत. अखंडपणे काम केले तरी एवढ्या गावांत पोहोचणे शक्य नाही. त्यासाठी सर्व पक्षांची ताकद मिळणे आवश्‍यक आहे. काँग्रेसच्या मदतीशिवाय ते शक्य होणार नाही.

आमदार विश्‍वजित कदम यांनी काँग्रेस एकसंध करत विशाल यांचे नेतृत्व केले. मुंबई, दिल्ली अशी धडक दिली. त्यांना उमेदवारी मिळवण्यात अपयश आले, मात्र आता विशाल यांच्या बंडात त्यांना मध्ये सोडून जाणे विश्‍वजित यांना कठीण आहे. त्याच वेळी पक्षाचे धोरणदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. या कोंडीतून ते कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागेल. चंद्रहार पाटलांना बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांचे चिन्ह मिळाले खरे, मात्र सांगलीतील बाळासाहेब कदमांचे आता सहाय्य लागणार आहे. त्याशिवाय त्यांची निवडणूक आव्हानात्मकच राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com