Sangli Results : 'विशाल पाटील काँग्रेसचेच खासदार, आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला'; विश्वजित कदमांचे महत्त्वाचे विधान

राज्यात काँग्रेसचे चौदा खासदार आहेत. चौदा खासदार घेऊन येत्या काळात राज्यात पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देऊ.
Sangli Lok Sabha Election Results Vishwajeet Kadam
Sangli Lok Sabha Election Results Vishwajeet Kadam esakal
Summary

''सांगलीच्या मातीतून डॉ. पतंगराव कदम, वसंतदादांचे विचार घेऊन ताकदीने जिल्ह्यात व राज्यात काम करणार आहोत.’’

कडेगाव : ‘‘लोकसभा निवडणुकीत (Sangli Lok Sabha Election Results) महाविकास आघाडीतील कोणाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. सांगलीत महाविकास आघाडी व काँग्रेसचाच (Congress) धर्म पाळला. विशाल पाटील काँग्रेसचेच खासदार आहेत. ते काँग्रेस व महाविकास आघाडीसोबत आहेत. डॉ. पतंगराव कदम व वसंतदादांचा विचार एक आहे. त्या विचाराने एकसंधपणे काम करून काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ,’’ असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केले.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम स्मारकातील सभागृहात नूतन खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा माजी आमदार कदम व आमदार डॉ. कदम यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.

Sangli Lok Sabha Election Results Vishwajeet Kadam
Uddhav Thackeray : ठाकरे गटाची खरी कसोटी विधानसभेला! लोकसभा निवडणुकीत कोकणात फटका; 'हे' दोन्ही उमेदवार पराभूत

डॉ. कदम म्हणाले,‘‘पलूस-कडेगाव मतदार संघातील लोकांनी व कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या विजयात मोठे योगदान दिले. त्यामुळे तुमचा पहिला सत्कार डॉ. पतंगराव कदम स्मारकस्थळी व्हावा, असे कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे या सत्काराला वेगळे महत्त्व आहे.’’

राज्यात काँग्रेसचे चौदा खासदार आहेत. चौदा खासदार घेऊन येत्या काळात राज्यात पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देऊ. सांगलीच्या मातीतून डॉ. पतंगराव कदम, वसंतदादांचे विचार घेऊन ताकदीने जिल्ह्यात व राज्यात काम करणार आहोत.’’ डॉ. जितेश कदम यांनी स्वागत केले. विनायक पवार, संतोष करांडे,जे. के. जाधव, सतपाल साळुंखे, सुरेश थोरात, विजय शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, संभाजी मुळीक, विजय होनमाने, मालन मोहिते, शोभा होनमाने व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

Sangli Lok Sabha Election Results Vishwajeet Kadam
Kolhapur Lok Sabha Result : देशाच्या निकालाप्रमाणेच कोल्हापूरचा निकाल, शाहू महाराज होते म्हणून..; काय म्हणाले महाडिक?

‘डॉ. कदम विजयाचे शिल्पकार’

विशाल पाटील म्हणाले,‘‘जिल्ह्यातील जनतेने निवडणूक मनावर घेतली होती. माझ्या विजयाचे शिल्पकार आमदार डॉ. विश्वजित कदम असून पलूस-कडेगाव मतदार संघाने जे मताधिक्य दिले ते मी विसरू शकत नाही. सांगलीत काँग्रेसचाच खासदार व्हावा म्हणून दोन वर्षांपासून डॉ. कदम प्रयत्न करीत होते. त्यांनी मनापासून जवळ केले. मोठ्या भावासारखे ते पाठीशी राहिले. मोहनराव कदम यांनी आशीर्वाद दिला.विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न राहील. सहा आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू. जिल्ह्याचे प्रश्न सोडवेन.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com