Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

भाजपला संविधानात बदल करण्यासाठी ४०० खासदार हवे आहेत.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Summary

''संजय पाटील यांनी अ‍ॅडजेस्टमेंट, सेटलमेंट केली. दहा वर्षे खासदार, तत्पूर्वी सहा वर्षे आमदार सेटलमेंट करूनच झाले. ''

जत : ‘‘गेल्या दहा वर्षांत संजय पाटील (Sanjay Patil) पाच मिनिटेही लोकसभेत बोलले नाहीत. जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात धन्यता मानली. जनतेला थापा मारण्यात ते पटाईत आहेत. दुसरीकडे, जयंत पाटील (Jayant Patil) काड्या घालण्यात पटाईत आहेत,’’ अशी जोरदार टीका माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी केली.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव, डफळापूर येथे सभांचे आयोजन केले होते. जगताप म्हणाले, ‘‘विशाल पाटील यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येतात. संजय पाटील यांना हिंदी, इंग्रजी बोलता तरी येते का? दहा वर्षांत पाच मिनिटे तरी लोकसभेत बोलले का? रांजणीचा डायपोर्ट, कवलापूरच्या विमानतळाचा पाठपुरावा केला का? पंढरपूर-विजापूर ब्रॉडगेजचा सर्व्हे झाला, पाठपुरावा केला नाही. सर्व नेत्यांनी संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.’’

Sangli Lok Sabha
खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

ते म्हणाले, ‘‘भाजपला संविधानात बदल करण्यासाठी ४०० खासदार हवे आहेत. मोदी-शहा देश विकत आहेत. मूठभर लोकांच्या हाती सत्ता एकवटत आहे. वसंतदादा, राजारामबापू असे दोन गट होते. वैचारिक मतभेद होते. त्यांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्ला केला नाही. आता माझ्यावर हल्ला होतोय.’’

विशाल पाटील म्हणाले, ‘‘भाजपच्या धोरणाला विरोध करण्याचे काम काँग्रेसने केले. जिल्ह्यात पाण्यावरून राजकारण सुरू आहे. कोयना धरणातून पाणी सोडले जात नव्हते तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो. निवडणूक जवळ आली आणि ऐनवेळी ‘मॅच फिक्सिंग’ करून काँग्रेसला, वसंतदादा घराण्याला उमेदवारी मिळू नये, यासाठी डाव रचला गेला.

Sangli Lok Sabha
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : ठाकरेंना हार घातलेले निम्मे नारायण राणेंच्या संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

नुरा कुस्ती करायची, संजय पाटील यांना पुन्हा निवडून आणण्याचे षड्‍यंत्र होते. त्यांच्यावर देवाची कृपा नाही. ही राक्षसी वृत्ती आहे. संजय पाटील यांनी अ‍ॅडजेस्टमेंट, सेटलमेंट केली. दहा वर्षे खासदार, तत्पूर्वी सहा वर्षे आमदार सेटलमेंट करूनच झाले. त्‍यांनी त्यांच्या सत्ता काळात काय केले, याचे आधी उत्तर द्यावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com