Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : ठाकरेंना हार घातलेले निम्मे नारायण राणेंच्या संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

युवकांनी आता विचारांनी पेटून उठले पाहिजे आणि तुमच्यामुळेच लोकसभेची ही निवडणूक सोपी होणार आहे.
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samantesakal
Published on: 
Summary

प्रत्येकाने १०० जणांना मतदानासाठी आणावे आणि कमळावर मतदान करण्यासाठी आवाहन करावे.

रत्नागिरी : देशाचा अभिमान युवावर्ग आहे. त्यामुळे युवकांनी आता विचारांनी पेटून उठले पाहिजे आणि तुमच्यामुळेच लोकसभेची ही निवडणूक सोपी होणार आहे. कालच्या सभेत ठाकरेंना हार घालणारे होते. त्यापैकी निम्मे लोक नारायण राणे (Narayan Rane) यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट महायुतीचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. शहरातील जयेश मंगल पार्कमध्ये आयोजित महायुतीच्या युवा मेळाव्यात ते बोलत होते.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant
Kolhapur Lok Sabha : महाराष्ट्रात भाजपसह एकनाथ शिंदे, अजितदादा गटाचा सुपडासाफ होईल; काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विश्वास

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), राजेश सावंत, बिपिन बंदरकर आदी, उपस्थित होते. सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आठ दिवसच शिल्लक आहेत. ते महत्त्‍वाचे आहेत. शहर, वाडी-वस्ती ठिकाणी जाऊन लोकांना मतदान करायला लावले पाहिजे. प्रत्येकाने १०० जणांना मतदानासाठी आणावे आणि कमळावर मतदान करण्यासाठी आवाहन करावे. जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा आमची अशीच खिल्ली उडवली होती.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant
Raju Shetti : 'लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना मीच जाब विचारू शकतो, कारण माझ्या मिशीला कुठेही खरकटे लागलेले नाही'

क्रिकेट खेळणारे हे काय आमदार होणार; परंतु तेव्हा आमच्याकडे मजबूत युवकांची फळी होती. त्या जोरावर मी आमदार झालो. त्यामुळे युवकांनी माहोल तयार केला पाहिजे. आपली नाळ थेट लोकांशी जुळली पाहिजे. स्टरलाईची ७०० एकर जागा परत एमआयडीसीकडे आली. त्या जागेपैकी काही जागेत डिफेन्स क्लस्टर प्रकल्प होणार आहे. त्यातूनही रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याबाहेर गेलेला ह्युंडाईचा प्रकल्प पुन्हा आणण्याच आम्हाला यश आले. १२ हजार कोटींची गुंतवणूक करून पुण्यात हा प्रकल्प येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thalapathy Vijay and Rahul Gandhi emerge at the centre of a political debate over the 2029 Lok Sabha election and the opposition’s potential prime ministerial candidate.
Ratnagiri industrial investment projects
Nanar bauxite project Ratnagiri latest update
Prakash Awade Lok Sabha election
Marathi News Esakal
www.esakal.com