Sangli Lok Sabha : विशाल पाटलांना उमेदवारी डावलली; मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त, 'काँग्रेस' फलकाला फासला रंग

'वसंतदादा घराण्याची कोंडी केली जात आहे, असा आरोप करत आता बंद दार फोडून आत जाण्याची वेळ आली आहे.'
Sangli Lok Sabha Miraj Congress Committee
Sangli Lok Sabha Miraj Congress Committeeesakal
Summary

काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून एक हक्काचा मतदारसंघ गमावला आहे. येथे विजयाच्या संधी असताना घेतलेला निर्णय धक्कादायक आहे.

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मिरज तालुका काँग्रेस कमिटी (Miraj Taluka Congress Committee) बरखास्त केली. त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासण्यात आला.

विशाल पाटील यांनी आता काँग्रेससाठी (Congress), वसंतदादांच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानीसाठी लढावे, असे आवाहन करत शेकडो कार्यकर्ते आज काँग्रेस कमिटीसमोर जमले. काँग्रेसला दिली नसल्याचे तीव्र पडसाद आज उमटले. जत पॅटर्न (Jat Pattern) राबवण्याची कालपर्यंत चर्चा होती. ती आज मिरज तालुका काँग्रेस कमिटीने मूर्त रूपात आणली. आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते कमिटीसमोर जमले. त्यांची बैठक झाली.

Sangli Lok Sabha Miraj Congress Committee
Hatkanangle Lok Sabha : आमदार प्रकाश आवाडेंचाही 'हातकणंगले'तून शड्डू; 'या' पक्षाकडून उमेदवारी घोषित, महायुतीचं वाढलं टेन्शन

त्यात जिल्हा काँग्रेसवर होत असलेल्या जाणीवपूर्वक अन्यायाचा पाढा वाचला. वसंतदादा घराण्याची कोंडी केली जात आहे, असा आरोप करत आता बंद दार फोडून आत जाण्याची वेळ आली आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या लढाईसाठी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करत असल्याची घोषणा तालुक्याध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी केले. यावेळी सुभाष खोत, प्रा. सिकंदर जमादार, सुनील आवटी, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील, सदाशिव खाडे, विशाल चौगुले, गणेश देसाई, सावन दरुरे आदी मंडळी उपस्थित होती.

निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर विशाल पाटील यांच्या गोटात हालचाली गतिमान झाल्या. आमदार विश्‍वजित कदम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सांगलीच्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी विशाल यांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी आज पाच उमेदवारी अर्ज घेत लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. या परिस्थितीत काँग्रेसची दिशा काय असावी, यावर कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी किंवा मंगळवारी घेतला जाऊ शकतो. त्याबाबत आमदार विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक शनिवारी (ता. १३) होईल, असे सांगण्यात आले.

Sangli Lok Sabha Miraj Congress Committee
Kolhapur Lok Sabha : अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा; असं का म्हणाले मुश्रीफ?

गुरुवारी (ता. १८) आणि शुक्रवार (ता. १९) या दोन दिवशी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार खासदार संजय पाटील यांचा अर्ज भरायला आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसेना उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला सांगलीत येणार आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांच्यासमोर अर्ज भरण्यासाठी व शक्तिप्रदर्शनासाठी १५ वा १६ एप्रिलचा पर्याय दिसत आहे. त्या दिवशी काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.

Sangli Lok Sabha Miraj Congress Committee
Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

‘काँग्रेस’वर रंग फासला

मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला. काँग्रेस पक्षावर आमचे प्रेम आहे. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून एक हक्काचा मतदारसंघ गमावला आहे. येथे विजयाच्या संधी असताना घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये राहून लढू शकत नाही. त्यासाठी कमिटी बरखास्त केली आहे. विशालदादांनी बंद दारावर लाथ घालावी, मदनभाऊंसारखी जिगरबाज लढत द्यावी, अशी आमची मागणी आहे. ते लढणार आणि जिंकणार, याचा आम्हाला विश्‍वास आहे.’’

-अण्णासाहेब कोरे, मिरज तालुकाध्यक्ष, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com