Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस गती घेऊ लागला आहे.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Summary

मतदान चार दिवसांवर आले तरी संजय पाटील अद्याप फिरकले नाहीत. दोन दिवसांपूर्वी ‘मविआ’चे चंद्रहार पाटील यांची विट्यात सभा झाली.

आळसंद : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस गती घेऊ लागला आहे. उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तळपत्या उन्हात प्रचारात धडका लावला आहे. महायुतीचे संजय पाटील, ‘मविआ’चे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रामुख्याने लढत आहे. तालुक्यात मातब्बर असलेल्या बाबर-पाटील गटाने संजय पाटील यांच्या मागे ताकद उभी केली आहे. परिणामी, एकीकडे संजय पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे.

दुसरीकडे, चंद्रहार पाटील (Chandrahar Patil), विशाल पाटील यांनी तालुका पिंजून काढला आहे. महायुती, ‘मविआ’तील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते पाळणार का, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर (Khanapur) तालुका हा महत्त्वाचा मानला जातो. खानापूर तालुक्यातील मताधिक्यावर निवडणूक निकाल अवलंबून असतो. आजवर लागलेल्या निकालावरून दिसून येते.

Sangli Lok Sabha
काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार निपाणीत; म्हणाले, 'मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार'

खासदार संजय पाटील यांना अनिल बाबर, सदाशिव पाटील, सुहास शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे.‌ तालुक्यात संजय पाटील यांची ताकद वाढली, असे चित्र असले तरी विशाल पाटील यांचे गावोगावी बाबर-पाटील समर्थकांकडून जोरदार स्वागत होत आहे.‌ बाबर-पाटील हे कार्यकर्त्यांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कितपत यश येईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Sangli Lok Sabha
Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

विशाल पाटील यांची तालुक्यात दुसरी फेरी झाली आहे. मतदान चार दिवसांवर आले तरी संजय पाटील अद्याप फिरकले नाहीत. दोन दिवसांपूर्वी ‘मविआ’चे चंद्रहार पाटील यांची विट्यात सभा झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) नेत्यांनी हजेरी लावली. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी दांडी मारली. विश्वजित कदम येणार होते. तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत सभेकडे पाठ फिरवली. यावरून ‘मविआ’मध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे, याचा प्रत्यय आला. पाटील यांना त्यांच्या ‘होम ग्राउंड’वर मत मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार, हे निश्चित.

काँग्रेसचे आनंदराव पाटील, चंद्रकांत चव्हाण, विनय भंडारे, खानापूर तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस खानापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, बाजार समितीचे संचालक अरुण जाधव यांच्यासह अनेकांनी विशाल यांना साथ दिली आहे. याशिवाय अनेकांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. घाटमाथ्यावरील गावांमध्ये वसंतदादांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांनी विशाल यांना साथ दिली आहे. खानापूर तालुक्यात महायुती व ‘मविआ’ यांच्या समोर अपक्ष विशाल पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.

Sangli Lok Sabha
'त्या' प्रकरणानंतर देशातून गुपचूप पळून जाण्यासाठी माजी पंतप्रधानांनी नातवाला मदत केली; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

‘स्वाभिमानी’चे खराडे यांचाही प्रभाव

यशवंत कारखान्याचे ५६ कोटी रुपये ऊस बिल थकीत होते. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी मोठा संघर्ष केला होता. ‘रास्ता रोको’ करून तहसील कार्यालयास घेराव घातला होता. खराडे यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून दिले आहे, हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्ञात आहे. तालुक्याच्या नागेवाडी, लेंगरे, माहुली परिसरात खराडे यांची ‘क्रेझ’ आहे. त्याचे मतांमध्ये रुपांतर कसे होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com