Sangli Loksabha : 'सांगलीत मविआ जो उमेदवार देईल, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल'; काय म्हणाले नितीन बानुगडे-पाटील?

सांगलीतील जागेचा तिढा कायम असताना शिवसेनेने (Shiv Sena) प्रचाराला सुरवात करून काँग्रेसला आव्हान दिले होते.
Shiv Sena leader Nitin Banugade-Patil
Shiv Sena leader Nitin Banugade-Patilesakal
Updated on
Summary

'हुकूमशाही पद्धत राबवणाऱ्या भाजपला हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा राज्यभर सुरू आहे.'

सांगली : सांगलीतील जागेचा तिढा कायम असताना शिवसेनेने (Shiv Sena) प्रचाराला सुरवात करून काँग्रेसला आव्हान दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) नेते शिवसेनेविरोधात आक्रमक होऊन सांगलीची जागा सोडणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील (Nitin Banugade-Patil), जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सूर बदलला. सांगली लोकसभेच्या जागेसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.

दोन दिवसांत उमेदवारी जाहीर केली जाईल. ‘‘मविआ’ जो उमेदवार देईल, त्याला पाठिंबा असेल,’ असे बानुगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, आज (ता. २१) सायंकाळी पाच वाजता मिरजेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘शिवसंवाद मेळावा’ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘शिवसेना नेते संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, वैभव नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.

Shiv Sena leader Nitin Banugade-Patil
Kolhapur LokSabha : पहिल्याच निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांनी 61 हजारांच्या फरकानं घाटगेंवर मिळवला विजय!

उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट संकेत दिले असल्यामुळेच तयारीला लागलो आहोत. लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल,’’ असेही त्यांनी सांगितले. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘हुकूमशाही पद्धत राबवणाऱ्या भाजपला हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा राज्यभर सुरू आहे. आचारसंहितेपूर्वीच मिरजेतील सभा नियोजित होती. त्यामुळे ही सभा होत आहे. दुपारी तीन वाजता कोल्हापूर येथून ते सांगलीकडे रवाना होतील. सांगलीत वसंतदादांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर मिरजेकडे रवाना होतील. मिरजेतील सभेस प्रतिसाद मिळेल. मेळावा सेनेचा असला तरी सभेसाठी मित्रपक्षांना निमंत्रण दिले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट संकेत दिल्यामुळे त्यादृष्टीने कामाला लागलो आहोत. स्पष्टच संकेत असल्यामुळे अन्य विचार आवश्यक वाटत नाही. वरिष्ठ पातळीवर त्याबाबत चर्चा झाली आहे. सांगलीच्या जागेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल. मिरजेतील सभेत ठाकरे यांच्याकडून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तिकीट वाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.’’ उपनेते अरुण दुधवडकर, प्रा. सिद्धार्थ जाधव, वैभव उगळे, संजय चौगुले, बजरंग पाटील, चंदन चव्हाण, शंभोराज काटकर, डॉ. किशोर ठाणेकर उपस्थित होते.

Shiv Sena leader Nitin Banugade-Patil
Loksabha Election : यादी लांबली... उत्सुकता ताणली; इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते अस्वस्थ, नजरा लागल्या मुंबई-दिल्लीकडे

वसंतदादांचे नातू मदत करतील - चंद्रहार पाटील

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीकडून जो निर्णय घेतला जाईल, त्याला बांधील राहणार आहे. तरीही जिल्ह्यात वसंतदादांनी हिंदकेसरी मारुती माने यांना राज्यसभेवर संधी दिली होती, त्याप्रमाणे त्यांचे नातू विशाल पाटील मला संसदेत पाठवतील, असा विश्वास आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com