सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली, नेमकं काय घडलं?

आज लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sangola mhada lok sabha angry voter set fire to the EVM machine marathi news
Sangola mhada lok sabha angry voter set fire to the EVM machine marathi newsesakal

आज लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान होत आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादाक घटना घडली आहे. सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली. सोंगोला तालुक्यातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर ही घटना घडली. सदर तरुणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

सांगोला तालुक्यात बागलवाडी मतदान केंद्र आहे. दादासाहेब चळेकर या मतदाराने ह्या मशिन पेटवल्या सकाळपासून या केंद्रावर ४१० मतदान झालं. हे मतदान सुरक्षित आहे. मात्र आता दुसऱ्या मशिन लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. loksabha election 2024 in maharashtra

Sangola mhada lok sabha angry voter set fire to the EVM machine marathi news
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

दादासाहेब चळेकर याने खिश्यात पेट्रोलची बाटली नेली होती. यानंतर त्यांनी मशिन जाळल्या. स्थानिक अधिकाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली आहे. दादासाहेब चळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.

Sangola mhada lok sabha angry voter set fire to the EVM machine marathi news
Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com