Sanjay Raut : शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध होता;संजय राऊत यांचा भाजप आणि राष्ट्रवादीवर आरोप

शिवसेना-भाजप युती असताना २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut
Sanjay Rautsakal

मुंबई : शिवसेना-भाजप युती असताना २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक झाल्यानंतर या पक्षामधीलकाही ज्येष्ठ नेत्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांच्या दाव्यानंतर भाजप वगळता अन्य पक्षांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊत यांचे दावे खोडले आहेत.

‘‘२०१९ मध्ये आधी शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरु होता. त्यावेळी शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली. परंतु शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. आम्ही तर एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही,’’ असे राऊत म्हणाले.

भाजपशी चर्चा फिसकटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी या दोन्ही पक्षांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचा शिंदे यांना विरोध होता, असा दावाही राऊत यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राऊत यांचा दावा खोडून काढला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाला राऊत यांचाच विरोध होता. मात्र आता ते अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करून धादांत खोटे बोलत आहेत, असे ते म्हणाले.

दावा फेटाळला

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्या दाव्याचा इन्कार केला. भाजपचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध नव्हता. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची हरकत नव्हती. उद्धव ठाकरेंची हरकत होती. वहिनींची (उद्धव ठाकरेंच्या पत्नी) इच्छा होती, तुम्ही मुख्यमंत्री बना म्हणून त्यांना अजय चौधरी, रवींद्र वायकर यांनी पाठिंबा दिला, असेही शिरसाट म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com