Satara Lok Sabha : 'महात्मा गांधी-नेहरूंच्या विचारांची मोदींकडून बदनामी'; शरद पवारांचा घणाघात

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहा वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत.
Satara Lok Sabha
Satara Lok Sabhaesakal
Summary

''विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले असून, त्याविषयी निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त उद्रेक आहे. त्याचा स्फोट या निवडणुकीत होईल.’’

वाई : सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. (स्व.) यशवंतराव चव्हाण, किसन वीर आणि वसंतदादा पाटील यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी आयुष्यभर गांधी, नेहरू यांचा विचार जोपासला. संसदेत असताना सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितास प्राधान्य दिले. मात्र, आज त्यांच्या विचाराला बदनाम करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनुयायी करीत असल्याची टीका खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केली.

सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या प्रचारार्थ आज महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. यावेळी शरद पवार काय बोलणार? हे ऐकण्यासाठी विराट जनसमुदाय लोटला होता. प्रारंभी तुतारीच्या निनादात शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.

Satara Lok Sabha
Raigad Lok Sabha : 'जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत संविधान बदलले जाणार नाही'; काय म्हणाले खासदार तटकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका करताना श्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील दहा वर्षांच्या काळात देशात प्रचंड महागाई आणि बेरोजगारी वाढली. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिलांवरील अत्याचाराची परिसीमा ओलांडली आहे.’’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहा वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपयेही आले नाहीत. मोदी व भाजपचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांना ही निवडणूक जिंकता येणार नाही. ते पैसे देऊन सभेसाठी लोक जमा करीत आहेत. नरेंद्र मोदींनी भरमसाठ कर्ज काढून, देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. लडाखमधील देशाची जमीन चीनने बळकावली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्याबद्दलचे कायदे बदलून टाकले आहेत. या अपमानाचा बदला घेण्याची ही निवडणूक आहे.’’

Satara Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला, उमेदवारी मागं घेण्यास कुणी भाग पाडलं? सामंत आज करणार पर्दाफाश

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘वाई मतदारसंघ लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ, बाळासाहेब भिलारे यांनी स्थापनेपासून निष्ठावंतांचा म्हणून जपला. आजच्या सभेला उसळलेला जनसागर पाहून वाई विधानसभा मतदारसंघच विजयाचा शिल्पकार असेल, याची खात्री झाली. विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले असून, त्याविषयी निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त उद्रेक आहे. त्याचा स्फोट या निवडणुकीत होईल.’’ बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘राजकीय स्तर घसरला आहे. गांधी, नेहरूंना दोष देणारे यशवंत विचारांचे पाईक नाहीत.’’

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. भारत पाटणकर, अभिनेत्री (राणुअक्का) अश्विनी महांगडे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संतोष बाबर, सुनील गव्हाणे, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांची भाषणे झाली. प्रा. राजेश सरवटे यांनी महाविकास आघाडीचे गीत सादर केले. संभाजी ब्रिगेड संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. प्रसाद सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिलीप बाबर व रमेश धायगुडे त्यांची वाई व खंडाळा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सारंग पाटील, तेजस शिंदे.

Satara Lok Sabha
Satara Lok Sabha : 'येत्या महिनाभरात देशात मोठ्या समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव'; PM मोदींचा गंभीर आरोप

तसेच राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला अध्यक्षा संजना जगदाळे, डॉ. सतीश बाबर, वर्षा देशपांडे, अल्पना यादव, समिंद्रा जाधव, अनिल जगताप, दीपक पवार, रमेश गायकवाड, नितीन भिलारे, रमेश धायगुडे, राजेंद्र शेलार, दिलीप बाबर, चरण गायकवाड, प्रताप देशमुख, राजाभाऊ खरात, सागर साळुंखे, सुधीर भोसले, नानासाहेब कासुर्डे, डी. एम. बावळेकर, विराज शिंदे, प्रताप यादव, नितीन जगताप आदी मान्यवर आणि वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

‘पाटील, पिसाळ यांचा आदर्श हवा’

शरद पवार म्हणाले, ‘‘हा देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत यशवंत विचारांचे पाईक असलेल्या (स्व.) लक्ष्मणराव पाटील, मदनराव पिसाळ यांसारख्या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com