Rohit Pawar : महायुतीकडून दोन हजार कोटींचे वाटप ; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत महायुती व मित्र पक्षांकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे.
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुती व मित्र पक्षांकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात दोन हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

याबाबतचे अनुभव दोन टप्यांतील निवडणुकांमध्ये दिसले. बारामतीत १५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका, टॅंकरमधून पैसा आणल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. प्रचार दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेले आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात झाली आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला होता. त्यावर पवार म्हणाले की, मुख्यमंत्री मुक्कामी राहणार नव्हते.

आता फाईल सही करू शकत नाहीत. असे असाताना ९ बॅगा कशासाठी आणल्या, हा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक आणि दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य आहेत. महायुतीचे उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे नाशिक, दिंडोरीतही पैसेवाटप होईल, असे त्यांनी सांगितले.

Rohit Pawar
Loksabha Election : हरियाना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली ; परिस्थिती अनुकूल, तरीही कुरघोडीचे राजकारण रंगले

खासदार राऊत यांच्या ८०० कोटींच्या भूसंपादन गैरव्यवहाराच्या आरोपावर बोलताना त्यांनी दोन वर्षांत सरकारने हजारो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जायला भीती वाटत आहे. सामान्य माणूस धडा शिकवेल, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे नाशिकमधील मोदी यांच्या सभेची जागा बदलल्याचा टोला पवार यांनी लगावला.

मतदानाचा टक्का घसरला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचाराचा फुगा फुटला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले राजकारण लोकांना आवडले नाही. सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात मतदान कमी झाले. भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला. मोदी यांच्या अंधभक्तांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. परिणामी याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यात महायुतीला १६ ते १८ जागा

महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार, यावर रोहित पवार यांनी भाष्य केले. भारतीय जनता पक्षाला १३ ते १४ जागा, शिवसेनेला (शिंदे) २ ते ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) एकही जागा मिळणार नाही. यामुळे महायुतीला राज्यात १६ ते १८ जागा मिळतील, असा दावा पवार यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com