Sharad Pawar : जरांगेंच्या विचाराला सहकार्य करावे

Lok Sabha Election 2024 : बीडमधून शरद पवारांची मतदारांना साद : सोनवणे यांच्या प्रचाराची सांगता
बीडमधील सभेत बोलताना शरद पवार.
बीडमधील सभेत बोलताना शरद पवार. esakal

Sharad Pawar News : शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो, की आणखी कोणी पुढे येत असतील, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. मागे जरांगे यांना विनंती केली की, महाराष्ट्रात कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

बीडमधील सभेत बोलताना शरद पवार.
Sharad Pawar : मोदींच्या पक्षात देशाच्या ऐक्याचा विचार नसल्याने भाजपच्या आसपासही जाणार नाही

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची सांगता शनिवारी पवार यांच्या सभेने झाली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, खासदार फौजिया खान, उमेदवार सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, उषा दराडे, साहेबराव दरेकर व गणेश वरेकर आदींची उपस्थिती होती. ‘राज्यकर्ते शेतकरीविरोधी आहेत, त्यांना धडा शिकवा.

बीडमधील सभेत बोलताना शरद पवार.
Supriya Sule : अशोक पवारांची ढाल बनून उभी राहणार

सरकारला शेतकरी व आया-बहिणींची आस्था नाही,’ असा गंभीर आरोपही पवार यांनी केला. पंतप्रधानांकडून सर्वांना समान न्यायाची अपेक्षा आहे. मात्र, मोदींकडून हे होत नाही. पंतप्रधान मुस्लिमांबद्दल जाहीर बोलतात. देश एकसंध ठेवण्यासाठी त्यांना मदत होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. शेतमालाला किंमत नाही. पंजाब, हरियाना भागातील शेतकरी दिल्लीत बसले. हमीभाव मिळावा, अशी मागणी केली, पण यांनी जुमानले नाही.

सरकार शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकऱ्यांचा हिसका दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेश टोपे, उमेदवार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश नवले, सय्यद सलीम व गणेश वरेकर यांचीही भाषणे झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com