Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबईः १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित जेडीयूचे माजी प्रदेश अध्यक्ष शशांक राव यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. जानेवारी महिन्यात जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शशांक राव यांनी दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने प्रेरित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यास अधिक सुलभता येईल. त्यामुळे मी योग्य निर्णय घेतला आहे, अशी भावना शशांक राव यांनी व्यक्त केली. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन भाजपात पक्षप्रवेश केला आहे, असेही राव म्हणाले.

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

यावेळी, खासदार पीयुष गोयल, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com