Shirur Constituency Lok Sabha Election Result : पवारांचा मावळा आढळरावांवर भारी ! राजकीय उलथापालथीने अमोल कोल्हेंचा विजय सोपा

Shirur Lok Sabha Election Result 2024 ncp sharad pawar Amol Kolhe ncp ajit pawar Shivajirao Adhalarao Patil : पुण्यातील शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड-आळंदी या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. यावेळची लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली त्याचं कारण अजित पवारांनी केलेली विधानं...
Shirur Constituency Lok Sabha Election Result : पवारांचा मावळा आढळरावांवर भारी ! राजकीय उलथापालथीने अमोल कोल्हेंचा विजय सोपा

Shirur Lok Sabha Election Result 2024 : पुण्यातल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाची यावेळी राज्यभर चर्चा झाली. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांच्यात थेट लढत झाली. आढळराव पाटलांनी हायटेक प्रचार आणि अमोल कोल्हेंच्या गावोगाव भेटी अन् भाषणं गाजले होते. शिरुरमध्ये यावेळी साधारण ५४ टक्के मतदान झाले होते.

loksabha election result 2024

शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांचा पराभव झालेला आहे.

शिरुर मतदारसंघात राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. सुरुवातीला अजित पवारांसोबत गेलेल्या कोल्हेंनी पुन्हा शरद पवारांसोबत राहाणं पसंत केलं होतं. तर आढळराव पाटलांनी शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडून तिकिट घेतलं होतं. परंतु शेवटी कोल्हेच विजयी ठरले आहेत.

कुणाला किती मतं पडली?

अमोल कोल्हे- ६,९८,६९२

आढळराव पाटील- ५,५७,७४१

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,४०,९५१

शिरुर लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय?

पुण्यातील शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड-आळंदी या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.

आंबेगावमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आमदार आहेत, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. भोसरीमधून भाजपचे एकमेव आमदार महेश लांडगे हे आहेत. हडपसरमधून चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते हे आमदार आहेत तर शिरुरमध्येही राष्ट्रवादीचेच अशोक पवार हे आमदार आहेत.

२०१९चे चित्र

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६३५८३०

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) मते : ५७७३४४

राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) मते : ३८०७०

जमीरखान कागदी (बहुजन समाज पक्ष) मते : ७२४७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ५८,४८६

Shirur Constituency Lok Sabha Election Result : पवारांचा मावळा आढळरावांवर भारी ! राजकीय उलथापालथीने अमोल कोल्हेंचा विजय सोपा
T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

वर्चस्व

  • २००४ : शिवसेना

  • २००९ : शिवसेना

  • २०१४ : शिवसेना

  • २०१९ : राष्ट्रवादी

'हे' मुद्दे प्रभावी ठरले

  • पुणे- नगर व पुणे- नाशिक रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी

  • रांजणगाव, चाकण एमआयडीसीतील घटत चाललेला रोजगार आणि ठेकेदारीचा वाद

  • कुकडी प्रकल्पातील पाण्याचे वाटप. डिंभे बोगद्याला विरोध.

  • चासकमान कालव्याची गळती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com