Loksabha Election : दिल्लीत ‘कॉमन मॅन’ची चलती ; दुकानदार, कामगार, एलआयसी एजंट अन् शिक्षकही मैदानात

सार्वत्रिक निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखली जाते. सामान्य माणूस मतदारराजा म्हणून या उत्सवात सहभागी होत असतो पण हाच राजा प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मात्र मोठी चुरस पाहायला मिळते. देशाच्या राजधानीमध्ये सध्या काहीसे असेच चित्र दिसते.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखली जाते. सामान्य माणूस मतदारराजा म्हणून या उत्सवात सहभागी होत असतो पण हाच राजा प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मात्र मोठी चुरस पाहायला मिळते. देशाच्या राजधानीमध्ये सध्या काहीसे असेच चित्र दिसते. दुकानदार, कामगार, फिटनेस ट्रेनर, चित्रपट निर्माते, धर्मगुरू, शिक्षक, एलआयसी एजंट, सनदी लेखापाल, डॉक्टर आणि पत्रकार देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

दिल्लीमध्ये अंजान आदमी पार्टी, गरीब आदमी पार्टी, हमारा सही विकल्प पार्टी, आपकी अपनी पार्टी आणि लोक पार्टी असे वेगवेगळे पक्ष निवडणूक लढत आहेत. जवळपास अशाच ५२ पक्षांच्या उमेदवारांनी दिग्गज नेत्यांच्या तोंडाला फेस आणला आहे. गृहिणी, निवृत्तिवेतनधारक, निवृत्त सरकारी कर्मचारी देखील निवडणूक लढवीत आहेत.

पुंजी हजार रुपये

वायव्य दिल्ली मतदारसंघातून नंदराम बागडी (वय ७१) हे रिंगणात आहेत. ते स्वतः अशिक्षित आणि बेरोजगार असून त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतःकडे केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम असल्याचे म्हटले आहे. बागडी भाजपच्या योगेंद्र चंडोलिया व काँग्रेसच्या उदित राज यांच्याशी टक्कर घेतील.

विजयाची आशा

सीमा रिझवी या इयत्ता आठवीपर्यंत शिकलेल्या गृहिणी चांदणी चौकमधून आझाद समाज पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचा हा पक्ष आहे. दलित आणि मुस्लिम मते आपल्याला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.

केवळ योग्य उमेदवारासाठी

पश्चिम दिल्लीतून पत्रकार रमेशकुमार जैन हे निवडणूक लढवीत असून त्यांना गरीब आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे. ते विमा प्रतिनिधी आहेत. ते स्थानिक पातळीवर दैनिकदेखील चालवितात. विशेष म्हणजे ते स्वतःसाठी मतदान करा अशी मागणी कधीच करत नाहीत फक्त अन्य मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा असा त्यांचा आग्रह असतो. कधीकाळी जे मुद्दे आम्ही मांडले होते, तेच आता काँग्रेस आणि भाजपसारखे प्रमुख पक्ष मांडताना दिसत आहेत. मोफत वीज, पेयजलासारखे सगळे मुद्दे आम्ही मांडले होते.

- नंदराम बागडी, उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com