Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

Solapur Lok Sabha Ground Report: सोलापुरात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे राम सातपुते, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि वंतिकडून अतिष बनसोडे मैदानात आहे. सोलापुरात वंचित गेम चेंजरच्या भूमिकेत असते.
Solapur Lok Sabha Ground Report
Solapur Lok Sabha Ground Reportesakal

सोलापूर लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे ला पार पडणार आहे. भाजप सोलापुरात नेहमी नवीन उमेदवार देते. २०१९ च्या निवडणुकीत डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी निवडून आले होते. वंचितमुळे त्यांना फायदा झाला होता. वंचितमुळे मतांचे विभाजन झाले आणि याचा फटका काँग्रेस उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांना बसला.  (Solapur Lok Sabha Ground Report In Marathi)

यावर्षी लढाई थोडी तगडी आहे. कारण तीन युवा उमेदवार आमने-सामने भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते, काँग्रेसकडून प्रणिती शिंदे ज्या सोलापूर मध्य मधून आमदार आहेत. तर वंचित पुरुस्कृत उमेदवार मैदानात आहेत. तिघांची देखील जोरदार चर्चा आहे. मात्र विकासाच्या बाबतीत सोलापूरकर नाराज आहे. इथं अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होती. मात्र विकास झाला नाही. त्यामुळे जनतेने भाजपला संधी दिली, तरी देखील रस्ते सोडून काहीच झालं नाही. रस्त्यांमुळे विकास होत नाही, स्थानिक उद्योग, शिक्षण नाही. सोलापुरातील तरुण पुणे, मुंबईला कामाला जातात. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर शहर भकास आहे. १० वर्ष भाजपची सत्ता होती. तरी देखील येथील प्रश्न सुटने नाही. आता पुन्हा राम सातपुते विकाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचे सांगत आहेत. मात्र १० वर्ष विकास का झाला नाही, असा सवाल स्थानिक मतदार करत आहेत.

राम सातपुतेंवर नाराजी?

हिंदुत्वाच्या मुद्यांवर राम सातपुते यांना सोलापुरात पाठिंबा आहे. मात्र जिथं पोटाचा आणि जिवन जगण्याचा प्रश्न असतो तिथे हिंदुत्व दुर राहतं. त्यामुळे सोलापुरात विकास नसल्यामुळे मतदारांमध्ये हिंदुत्व आणि अविकासती, असे विभाजन आहे. यामुळे सातपुतेंना फटका बसण्याची शक्यता आहे. सातपुते निवडून आले तरी फार काही लिड त्यांना मिळणार नाही, अशी परिस्थिती मतदारसंघात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तप प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात सभा झाली. कारण भाजपला देखील या मतदारसंघात भिती वाटत आहे. राम सातपुते निवडून आले की मतदारांशी संपर्क ठेवण्यात कमी पडतात. कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नाही, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

प्रणिती शिंदे यांची भूमिका काय?

सोलापूर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. ११ वेळा याठिकाणी काँग्रेसचा खासदार राहीला आहे. तर पाचवेळा भाजपचा आमदार राहीला आहे.  सुशीलकुमार शिंदे यांचा या मतदार संघातून गेल्या दोन सलग निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे आता त्यांची कण्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत. प्रणिती शिंदे यांच्या बाजूने थोडी जमेची बाजू आहे. पण वंचित फॅक्टर गेम चेंजर ठरला तर त्यांना धक्का बसू शकतो. स्थानिक मतदारांशी चर्चा केली. तेव्हा प्रणिती शिंदे यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण वाटलं पण त्यांचा विजय हा वंचितच्या खांद्यावर अवलंबून आहे. वडीलांना संधी दिली आता विकासाठी मुलीली संधी द्यावी, अशी भूमिका मतदारांची आहे.

२०१९ ला भाजप उमेदवार डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना ५,२४,९८५ मते मिळाली होती. सुशीलकुमार शिंदे यांना ३,६६,३७७ मते मिळाली होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ मते मिळाली होती. आता वंचितचे मते काँग्रेसच्या मताधिक्यात अॅड केले तर सुशीलकुमार शिंदेंना विजय नक्की होता. काँग्रेसला नेहमी वंचितमुळे फटका बसला आणि यात भाजप उमेदवाराचा विजय होतो.

Solapur Lok Sabha Ground Report
Loksabha Election : लग्नसोहळ्यांतही रंगतोय प्रचाराचा फड ; साहेब आले म्हणून नागरिक अन् मतदार भेटले म्हणून उमेदवार खुश

वंचितचा सुशिक्षित उमेदवार मैदानात -

वंचित पुरुस्कृत अतिष बनसोडे सोलापुरात निवडणुकीत उभे आहे. विजयाची शर्यतीत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. जो विकास काँग्रेस आणि भाजपने केला नाही तो आपण करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. भाजपने धर्मात फूट पाडण्याचे राजकणार केले. विडी कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे. विडी कामगारांचे नेते आडाम मास्तर यांनी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला पण त्याचे श्रेय मोदींनी घेतले, असा आरोप अतिष बनसोडे यांनी केला.

आपण विजयाच्या शर्यतीत आहे. मी उमेदवार नाही तर मित्र आहे, असे बनसोडे म्हणाले. राम सातपुते आणि प्रणिती शिंदे मतदारांची दिशाभूल करत असल्याचे देखील ते म्हणाले.

विडी कामगारांचे प्रश्न प्रलंबित- 

सोलापूर जिल्हा असला तरी जिल्हा वाटत नाही. राजकीय उदासीनतेमुळे इंथ काहीच विकास नाही. राजकारणी येतात आणि गप्पा मारून जातात. निवडून आले की तोंड दाखवत नाहीत, अशी भूमिका विडी कामगारांनी माडंली.  विडी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

सोलापुरात ७० हजार कामगार विडी उद्योगांवर अवलंबून आहेत. धुम्रपान विरोधी कायदा आणि किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे कामगार आजही वेतनासाठी लढा देत आहेत. ३५४ रुपयांऐवजी कामगारांना १७० रुपये मिळतात. आर्थिक शोषण ही मोठी समस्या बनली आहे. 

Solapur Lok Sabha Ground Report
Jalgaon Lok Sabha Constituency : स्थानिक मतभेद विसरुन जोमाने कामाला लागा : चंद्रशेखर बावनकुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com