Shirur Loksabha : अमोल कोल्हे महाराष्ट्राचा स्वाभिमान ; सुप्रिया सुळे

‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना बाके वाजविणारा खासदार पाहिजे की कांदा बाजारभावावर बोलणारा खासदार पाहिजे? मेरिट बघून पुन्हा एकदा या भागाचा प्रतिनिधी म्हणून अभ्यास आणि कर्तृत्ववान डॉ. अमोल कोल्हे यांना आशीर्वाद द्या.
Shirur Loksabha
Shirur Loksabhasakal

महाळुंगे पडवळ : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना बाके वाजविणारा खासदार पाहिजे की कांदा बाजारभावावर बोलणारा खासदार पाहिजे? मेरिट बघून पुन्हा एकदा या भागाचा प्रतिनिधी म्हणून अभ्यास आणि कर्तृत्ववान डॉ. अमोल कोल्हे यांना आशीर्वाद द्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा. आमच्याकडे पैशाची अतिवृष्टी झाली. तुमच्याकडेही होईल. त्यांना पकडा व पोलिसांकडे द्या. सगळ्या बँकांवर लक्ष ठेवा. धमक्यांना घाबरू नका,’’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पेठ (ता. आंबेगाव) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, कॉंग्रेसचे राजू इनामदार, विक्रम भोर, पूजा वळसे पाटील, सुरेखा निघोट, अल्लू इनामदार, भारती शेवाळे आदी उपस्थित होते.

Shirur Loksabha
Pune Accident : वाघोलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत अपघाताच्या प्रमाणात वाढ

‘‘लोकसभेत कांद्याच्या भावाबाबत मी आणि अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम्हाला निलंबित केले जाते. कांद्याला हमीभाव मागणे, हा गुन्हा आहे का? केंद्रातील सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. या देशातील एकही कामगार परमनंट (कायम) होणार नाही, हे केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे मी आणि अमोल कोल्हे यांनी हाणून पाडले आहेत. वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, बँक, एमआयडीसी, रस्ते, कारखाने काँग्रेसच्या काळात झाले. मग तुमच्या पदरात या सरकारने काय टाकले? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याबाबत केंद्रातील सरकार बोलत नाही.’’

देवदत्त निकम म्हणाले, ‘‘इस बर भाजप हद्दपार, असे शेतकऱ्यांचे ठरले आहे. खतांचे बाजारभाव दुप्पट तिप्पट झाले आहेत. कांदा, दूध, सोयाबीन आणि बटाटा पिकला बाजारभाव नाही. कलमोडीचे आश्वासन देईल त्यांच्यावर सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा विश्वास नाही.’’ सुरेश भोर म्हणाले, ‘‘गेली ३५ वर्षे सातगाव पठार भागातील जनतेला कलमोडीचे गाजर दाखविले जाते. जनतेचा विकास करण्यासाठी तिकडे गेलो, असे सांगितले जाते. परंतु कमविलेले घबाड लपविण्यासाठी ते तिकडे गेले आहेत.’’

अशोक काका धुमाळ, राजू इनामदार, संभाजीराव काळे, साधना धुमाळ, बी. आर. कराळे, बाळासाहेब पवळे, दिलीप पवळे, अशोकराव राक्षे आदींची भाषणे झाली. अशोक राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश पवळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com