Sanjay Raut: भारतात सध्या रशिया, चिनी राजकीय पॅटर्न सुरु; राऊतांचा हल्लाबोल

आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते, कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. जंगलराज सुरु आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News esakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतीच ईडीनं अटक केली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात सध्या कोणीही सुरक्षित नाही, जंगलराज सुरु आहे. देशात सध्या रशिया आणि चिनी राजकीय पॅटर्न सुरु असल्याचंही ते म्हणाले. (The pattern going on in India is Gujrat Pattern which is similar in Russia and China)

यंदाची निवडणूक ही दिवसेंदिवस भाजपसाठी अधिकच कठीण होत चालली आहे. त्यामुळं भाजपकडून आणि त्यांच्या सर्व सहकारी पक्षांकडून हेमंत सोरेन आणि इतर अनेक नेत्यांना अशा प्रकरे त्रास देण्याचं काम सुरुच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही.

कोणालाही अटक होऊ शकते, कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. जंगलराज सुरु आहे. जसं रशियात पुतीनचा सुरु आहे. चीनमध्ये देखील सुरु आहे, तोच पॅटर्न इथं सुरु आहे ज्याला गुजरात पॅटर्न म्हटलं जातं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sanjay Raut News
PM Modi on Moscow Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचा PM मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध; म्हणाले, रशियन सरकार...

यांनी केजरीवालांना खोट्या खटल्यात फसवलं गेलं असून तर त्यांचा पक्ष मोडून त्यांचं सरकार पाडू इच्छित आहेत. केजरीवालांकडं पूर्ण बहुमत आहे. भाजपनंही दिल्लीत निवडणूक लढवली आहे तरी पाच जागांपेक्षा जास्त मिळालेल्या नाहीत. (Latest Maharashtra News)

जरी केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नसतील तरी भाजपला त्यामुळं त्रास होण्याचं कारण नाही. पण केजरीवालांसाठी हा मोठा महासंग्राम आहे. कारण देशातील महत्वाचा दुसरा स्वातंत्र लढाच सुरु असून यासाठी तुम्ही तुरुंगातूनही काम करु शकता, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut News
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर असणं किंवा नसणं ही मोठी गोष्ट नाही. पण केजरीवालांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे. ईडी आणि सीबीआयनं निवडलेलं नाही, ते लोकांचे नेते आहेत, लोकांनी त्यांना बहुमत दिलं आहे. त्यामुळं आता लोकच ठरवतील की त्यांनी मुख्यमंत्रीपदावर रहावं किंवा नाही, अशी भूमिकाही यावेळी संजय राऊत यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com