Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

'वारसा कर' प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या स्टार प्रचारकांनी काँग्रेसविरोधात रान पेटवलं आहे.
narendra modi mallikarjun kharge
narendra modi mallikarjun khargeesakal

कलबुर्गी : 'वारसा कर' प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या स्टार प्रचारकांनी काँग्रेसविरोधात रान पेटवलं आहे. पण आता या प्रचाराला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी थेटपणे प्रत्युत्तर दिलं आहे. निझामाच्या काळातही हा प्रकार झाला नाही, आता तर देशात लोकशाही आहे, असं खर्गेंनी म्हटलं आहे. कर्नाटकातील कलबुर्गी इथं प्रचार सभेत ते बोलत होते. (This didnt even happen during time of Nizams we are democracy now says Mallikarjun Kharge on Inheritance tax row)

भाजपवाले म्हणताहेत की काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेऊन ती मुस्लिमांना देणार आहे. पण हा प्रकार निझामाच्या काळातही होऊ शकला नाही आता तर देशात लोकशाही आहे आणि काँग्रेस अशी वेळ कधीही येऊ देणार नाही. त्याचबरोबर काँग्रेस कोणाचंही मंगळसूत्र काढून घेणारी काँग्रेस नाही. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसनं देशासाठी आपल्या लोकांना गमावलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे, अशा लोकांना तुम्ही नावं ठेवता! असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com