Hatkanangle Lok Sabha Constituency
Hatkanangle Lok Sabha Constituencyesakal

Hatkanangle Lok Sabha : 'चिन्हात' अडकला पाठिंब्याचा निर्णय; 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींची कोंडी, 'मशाल'वर शिवसेना ठाम

दोन दिवसांत पाठिंब्याच्या निर्णयानंतरच हातकणंगले लोकसभा मतदार संघातील (Hatkanangle Lok Sabha Constituency) चित्र स्पष्ट होणार आहे.
Summary

स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे की मशाल हातात घ्यायची, यावरून राजू शेट्टी यांची कोंडी झाली आहे.

जयसिंगपूर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) पाठिंब्यासाठी स्वाभिमानीच्या गोटात हालचाली सुरू असताना, शिवसेनेकडून मशाल चिन्हाचा आग्रह होत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांची गोची झाली आहे. स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे की मशाल हातात घ्यायची, यावरून त्यांची कोंडी झाली आहे. एकूणच चिन्हाच्या निर्णयावरून शेट्टींच्या पाठिंब्याचा निर्णयही लटकला आहे.

मात्र, दोन दिवसांत पाठिंब्याच्या निर्णयानंतरच हातकणंगले लोकसभा मतदार संघातील (Hatkanangle Lok Sabha Constituency) चित्र स्पष्ट होणार आहे. सुरुवातीला ''एकला चलो रे''ची भूमिका होती. महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच शेट्टी यांनी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांत प्रचारात आघाडी घेतली. ऊसदराच्या आंदोलनात कारखानदार आणि शासनावर दबाव टाकत गतवर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा फरक देण्याचे कारखानदारांकडून कबूल करून घेतले.

Hatkanangle Lok Sabha Constituency
माझं वय झालं म्हणता, मग तुम्ही तर कशाला मैदानात उतरता? मंडलिकांचा पवारांना थेट सवाल अन् 2009 निवडणुकीत वय ठरलं कळीचा मुद्दा!

फरकाच्या रकमेपोटी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुमारे दीडशे कोटी रुपये द्यावे लागतात. कारखानदारांकडून रक्कम आदा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दिला असला, तरी आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लटकल्याने शेतकऱ्यांच्या हातात जादाची रक्कम पडू शकली नाही. प्रशासनाच्या मध्यस्थीने झालेल्या या तोडग्यानंतर पैसे मिळाले असते, तर शेट्टींच्या प्रचारात हा एक प्रभावी मुद्दा बनला असता. ऊसदर आंदोलन शेतकऱ्यांसाठी कसे नुकसानकारक ठरले, हे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होणार आहे.

Hatkanangle Lok Sabha Constituency
Kolhapur MNS : 18 वर्षे झाली तरी, मनसेची अस्तित्वासाठीच लढा; स्थानिक पातळीवर ताकदीच्या नेतृत्वाची गरज!

उमेदवार आणि मत विभागणी लक्षात घेऊन स्वाभिमानीने महाविकास आघाडीतील केवळ शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र, राष्ट्रवादीचा काही प्रमाणात याला विरोध असल्याची चर्चा सुरू आहे. प्रचारात राष्ट्रवादीचे नेते स्वाभिमानीबरोबर दिसले, तर शेतकऱ्यांमध्ये पुन्हा टीका होऊ शकेल, असा स्वाभिमानीचा अंदाज आहे. त्यामुळेच केवळ ठाकरे गटाच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानीकडून आग्रह धरला जात आहे. असे असले तरी मशाल चिन्हाचा आग्रह शिवसेनेकडूनही धरला जात असल्याने शेट्टींची अडचण झाली आहे. दोन दिवसांत याप्रश्नी चित्र स्पष्ट होऊन लढतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

स्वाभिमानीच्या अस्तित्वाचा प्रश्न

शेट्टींनी ‘मशाल’ हातात घेतली तरच विचार होईल, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या शेट्टी यांना हातात मशाल घेतली, तर स्वाभिमानीचे अस्तित्व राहील का? याची चिंता वाटते.

Hatkanangle Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha : 'मविआ'च्या उमेदवारीचा कऱ्हाडच राहणार केंद्रबिंदू; कोणाला मिळणार उमेदवारी? उत्सुकता शिगेला

‘मशाल’ न्यायचीय घराघरांत

लोकसभेनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राज्यात मोठे यश मिळवायचे आहे. मात्र, त्यासाठी लोकसभा निवडणुकीतच पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह घराघरांत पोहोचविण्यासाठी लोकसभा निवडणूक एक संधी आहे. त्यामुळेच ठाकरे यांच्याकडून मशाल चिन्हाचा आग्रह धरला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com