Kolhapur Lok Sabha Election
Kolhapur Lok Sabha Electionesakal

Kolhapur Loksabha : '..म्हणून कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असं चालत नाही’; सतेज पाटलांचा थेट निशाणा

‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो.
Summary

‘सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही विषय नव्हता.'

कोल्हापूर : ‘उमेदवारी जाहीर होत नाही यावरून महायुतीत किती भांडणे आहेत ते कळते. कोल्हापूरची माती वेगळी आहे, धर्मही वेगळा आहे. त्यामुळे कोल्हापुरात कोणतीही हवा चालत नाही, म्हणून मान गादीला आणि मत मोदींना असे कोल्हापुरात होणार नाही’, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

Kolhapur Lok Sabha Election
Sangli Loksabha : ठाकरेंचा ‘शब्द’, काँग्रेसला ‘कोडे’; सांगलीचा तिढा सुटणार कसा? चंद्रहारच्या घोषणेनंतर ठिणग्या

आमदार पाटील म्हणाले, ‘श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. या सगळ्यांचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे. आज विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर २५ वर्षांनी काँग्रेस चिन्हासमोरचे बटन दाबायला मिळणार आहे.

‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले. ॲड. आंबेडकर यांचा राज्यातील निर्णय झालेला नाही. त्यांनी आमच्या सोबत यावे, अशी इच्छा आहे.’

Kolhapur Lok Sabha Election
गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर आज निर्णय; अमित शहा करणार शिक्कामोर्तब!

राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, ‘शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसांत निर्णय होईल. हातकणंगलेची जागा ही शिवसेनेची आहे; पण आम्हाला वाटते की, शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा असेल. आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा, अशी आमची भूमिका आहे.’

‘आज खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल कुणाला आदर आहे, हे समोर आले आहे. उदयनराजे यांची गरज होती, त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता. मग आता भाजपला उदयनराजे यांची गरज आहे की, नाही मला माहीत नाही,’ असे पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. ‘अण्णा हजारे हे सगळ्याच विषयांत बोलले तर त्यांची भूमिका सार्थक ठरेल. गेले कित्येक वर्षे अण्णा हजारे सरकारच्या विरोधात बोललेले नाहीत’, असेही ते म्हणाले.

Kolhapur Lok Sabha Election
कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित घाटगेंचे नाव आजपर्यंत माझ्या कानावर आले नाही; काय म्हणाले मुश्रीफ?

सांगलीवर हक्क काँग्रेसचाच

‘सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही विषय नव्हता. सांगलीत विशाल पाटील उभे राहिले तर ते निवडून येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराची घोषणा करणे हा त्यांचा निर्णय आहे; पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असे वाटते’, असे सतेज पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com