Dhairyasheel Mane vs Raju Shetti
Dhairyasheel Mane vs Raju Shettiesakal

माने-शेट्टी यांच्यातच पारंपरिक लढत; राहुल आवाडे, सदाभाऊंच्या भूमिकेने वाढणार रंगत, 'वंचित'ची भूमिकाही ठरणार निर्णायक

महायुतीतील उमेदवारीच्या उलटसुलट चर्चेमुळे खासदार माने समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. माने यांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली आहे.
Summary

महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार दिल्यास लढत अधिक चुरशीची होऊ शकते.

इचलकरंजी : विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या महायुतीच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात खासदार माने व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच पारंपरिक लढत होणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (Rahul Awade) स्वतंत्र रिंगणात उतरणार की कोणाची उमेदवारी घेणार, याकडे लक्ष आहे.

Dhairyasheel Mane vs Raju Shetti
काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीला तयार, पण 'सांगली'च्या लढतीतून माघार घेणार नाही; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. बहुजन वंचित आघाडीच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आहे. महायुतीतील उमेदवारीच्या उलटसुलट चर्चेमुळे खासदार माने समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. माने यांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली आहे. पण, आता पुढील लढाई सोपी नाही. समोर पुन्हा एकदा राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारखा प्रबळ उमेदवार आहे.

गत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही ते आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय राहिले आहेत. सध्या शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. पण, ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीने शेट्टी यांना अधिकृतपणे पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रातील एक तुल्यबळ लढत पाहावयास मिळणार आहे.

Dhairyasheel Mane vs Raju Shetti
Sangli Lok Sabha : काँग्रेसचा होतोय 'बाहुबली', 'कटप्पा'च्या भूमिकेत कोण? राजकीय वर्तुळात चर्चा

दुसरीकडे खासदार माने यांच्यासमोर यावेळी कडवे आव्हान आहे. यावेळी त्यांच्या पक्षाचा एकही आमदार मतदारसंघात नाही. भाजप आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावरच त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो. मतदारसंघातील भाजपची बांधणी व मोदी इफेक्टचा माने यांना कितपत फायदा होणार हे पाहावे लागेल. या मतदारसंघात जातीय समीकरणे महत्त्‍वाची ठरली आहेत.

त्यामुळे राहुल आवाडे यांची उमेदवारी असल्यास जैन समाजातील मतांची विभागणी होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे ते खरोखरच लोकसभेच्या मैदानात उतरणार काय, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले या तीन विधानसभा क्षेत्रांत आवाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आवाडे गटाची भूमिका महत्त्‍वाची असणार आहे. महायुतीकडे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची भूमिकाही महत्त्‍वाची असणार आहे.

Dhairyasheel Mane vs Raju Shetti
साताऱ्याचा उमेदवार आज ठरणार? शरद पवार साधणार 200 कार्यकर्त्यांशी संवाद, 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

‘वंचित’ची ताकद कुणाच्या पथ्यावर?

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद लक्षणीय आहे. गत निवडणुकीत त्याचा अनुभव आला आहे. नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची इचलकरंजीत झालेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांचा उमेदवार रिंगणात उतरल्यास रंगत येणार आहे. त्यांच्या उमेदवारीचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा होत आहे.

‘महाविकास’ने स्वतंत्र उमेदवार दिल्यास चुरस

महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार दिल्यास लढत अधिक चुरशीची होऊ शकते. तूर्त तरी पहिल्या टप्प्यात आजी-माजी खासदार यांच्यातच पारंपरिक तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com