Raigad Lok Sabha
Raigad Lok Sabhaesakal

Raigad Lok Sabha : 'निवडणुकीत पराभव झाला, तर राजकारणातून संन्यास घेईन'; 'मविआ'च्या उमेदवाराचा मोठा निर्णय

राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत.
Summary

आज तटकरेंना काहीही केले तरी मुस्लिम समाजाची मते मिळणार नाहीत. आता माझ्या समाजाची मते फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

गुहागर : राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्यासाठी एक मत देण्याचा अधिकार असलेला खासदार म्हणून मला निवडून द्या. आज देशात मोदी विरुद्ध लाट आहे. आजपर्यंत शिवसेनेसोबत नसलेला मुस्लिम समाज (Muslim Community) सोबत आला आहे, असे प्रतिपादन रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनंत गीते (Anant Geeta) यांनी केले, तसेच रायगड लोकसभा मतदार संघातून सत्तर टक्के मतांनी विजयी होईन. तसे नाहीच झाले तर राजकारणातून संन्यास घेईन, असेही त्यांनी सांगितले.

Raigad Lok Sabha
तपोवनवर घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; रखरखत्या उन्हातही उत्साह, आजी-माजी आमदारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

शृंगारतळी येथे आयोजित इंडिया आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. गुहागर (Guhagar) तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गट आणि पाटपन्हाळे गणातील काही गावांची महाविकास आघाडीची प्रचारसभा भवानी सभागृहात झाली. या सभेत गीते म्हणाले, आजची निवडणूक वेगळी आहे. महाराष्ट्राने यापूर्वी फोडाफोडीचे, कपट कारस्थानांचे दुर्दैवी राजकारण या आधी पाहिलेले नव्हते. भाजपने ते सुरू केले.

आज तटकरेंना काहीही केले तरी मुस्लिम समाजाची मते मिळणार नाहीत. आता माझ्या समाजाची मते फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. या सभेला आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, सचिन बाईत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल घारे, पद्माकर आरेकर यांच्यासह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Raigad Lok Sabha
'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

व्यासपीठावरच वाद प्रतिवाद

अनंत गीतेंनी भाषणाची सुरवात करताना मागील लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदार संघात मी भास्कर जाधव यांच्याविरोधात लढलो. कारण, तटकरेच इथून उभे होते, असे विधान केले. हे वाक्य ऐकताच आमदार जाधव यांनी उभे राहत हे बोलणं आता टाळलं पाहिजे, या वाक्याचा वेगळा अर्थ लावून प्रचार केला जातो, मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, असेही सांगत जाधव खुर्चीवर विराजमान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com