Kolhapur Lok Sabha Sachin Sawant
Kolhapur Lok Sabha Sachin Sawantesakal

Kolhapur Lok Sabha : महाराष्ट्रात भाजपसह एकनाथ शिंदे, अजितदादा गटाचा सुपडासाफ होईल; काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विश्वास

'देशात काळा पैसा आला नाही. गोरगरिबांच्या नावावर पंधरा लाख रुपये देणार होते तेही दिलेले नाहीत.'
Summary

'मोदी यांनी कोल्हापुरात येऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. लोकांच्या जमिनी घेणार, मंगळसूत्र जाणार, अशा भूलथापांना लोक बळी पडणार नाहीत.'

कोल्हापूर : ‘गेल्या दहा वर्षांत देश कर्जबाजारी झाला. देशात गॅस व पेट्रोल दरासह महागाई वाढत आहे. विकासकामांचा पत्ता नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकांना सांगण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे ते जातीय तेढ निर्माण करीत आहेत. मोदी बिनकामाचे आहेत, हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे देशातून आणि महाराष्ट्रातून भाजपसह एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या गटाचा सुपडासाफ होणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केले.

Kolhapur Lok Sabha Sachin Sawant
Satara Lok Sabha : 'येत्या महिनाभरात देशात मोठ्या समाजविघातक घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव'; PM मोदींचा गंभीर आरोप

जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंत म्हणाले, ‘देशात काळा पैसा आला नाही. गोरगरिबांच्या नावावर पंधरा लाख रुपये देणार होते तेही दिलेले नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, पण भाजपने त्यांचा खर्चात वाढ केली आहे. भरमसाठ टॅक्स आकारून ठराविक उद्योगपतींना फायदा करून दिला जात आहे. मोदींविरुध्द प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Kolhapur Lok Sabha Sachin Sawant
Satara Lok Sabha : 'महात्मा गांधी-नेहरूंच्या विचारांची मोदींकडून बदनामी'; शरद पवारांचा घणाघात

मोदी यांनी कोल्हापुरात येऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. लोकांच्या जमिनी घेणार, मंगळसूत्र जाणार, अशा भूलथापांना लोक बळी पडणार नाहीत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून लोकांना धमकावणे, भीती दाखविण्याचेच काम दहा वर्षांत झाले आहे. यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घेऊनच सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com