Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : हॅट्ट्रिक तर होणार; पण पराभवाची की विजयाची? विनायक राऊत विरुद्ध नारायण राणेंमध्ये सामना

नारायण राणे (Narayan Rane) यांची लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे; परंतु यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला होता.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabhaesakal
Published on
Summary

पक्षाने दिलेल्या ताकदीच्या बळावर आता पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी नारायण राणे यांच्यासमोर आहे.

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीत राऊत विजयाची हॅट्ट्रिक साधणार की, नारायण राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत (Vinayak Raut) दोनवेळा विजयी झाले आहेत. तिसऱ्यावेळी विजय प्राप्त करून हॅट्ट्रिक साधण्यासाठी ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Maratha Reservation : शरद पवार हेच खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

नारायण राणे (Narayan Rane) यांची लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे; परंतु यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला होता. काँग्रेसमध्ये असताना ते एकदा कणकवली आणि दुसऱ्यांदा बांद्रा येथून विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली. पक्षाने दिलेल्या ताकदीच्या बळावर आता पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी नारायण राणे यांच्यासमोर आहे.

मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. विविध समाजासह प्रत्‍येक घटकातील मतदारांवर राजकीय पक्षांकडून लक्ष केंद्रित करण्यात आल्‍याचे चित्र आहे. त्या दृष्टीने प्रचारसभा व बैठका घेतल्या जात आहेत. राजकीय उलथापालथीमुळे दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे बदलली आहेत. त्‍यामुळे दोन्ही उमेदवार नव्या दमाने प्रचारात उतरले आहेत.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Sangli Lok Sabha : 'चंद्रहार पाटलांना विजयी केले, तर विश्‍वजित कदमांना वाघ ही पदवी देऊ'; संजय राऊतांची मोठी घोषणा

गाव बैठका, सभा, मेळावे अशा प्रचाराच्या फेऱ्या झाल्यानंतर आता विविध समाज व त्‍यातील घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत राजस्थानी, गुजराती, मारवाडी, पटेल हा बाहेरील जिल्ह्यातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्थिरस्थावर झाला आहे. ही मते आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्‍नात उमेदवार आहेत. जिल्ह्यातील डॉक्टर्स, वकील, व्यापारीवर्ग मुंबईमध्ये वास्तव्यास असलेला चाकरमानी, विविध गावांतील मुंबई मंडळे, विविध ज्ञाती समाजबांधवांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Hatkanangale Lok Sabha : राजू शेट्टींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात; जाहीर सभेत म्हणाले, हिंदू-मुस्लिम संकटात नाहीत तर..

प्रत्‍येक मत महत्त्‍वाचे

लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एकेक मत महत्त्‍वाचे आहे, हा विचार करून समाजातील कोणताही एक घटक प्रचारापासून दूर राहू नये याची खबरदारी उमेदवारांकडून तसेच पक्षांकडून घेतली जात असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why is Maharashtra building nuclear power projects?
Nitesh Rane sentence suspension details
nitesh rane statement mumbai goa highway
Marathi News Esakal
www.esakal.com