Loksabha Election 2024 : खैरे-दानवे यांच्यात दिलजमाई ; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तास चर्चा

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे दुसरे इच्छुक उमेदवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, दानवे यांनी आज खैरे यांच्या येथील निवासस्थानी जात भेट घेतली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे दुसरे इच्छुक उमेदवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, दानवे यांनी आज खैरे यांच्या येथील निवासस्थानी जात भेट घेतली. त्यांना पेढा देखील भरविल्याने दोघांत दिलजमाई झाल्याचे दिसून आले. दानवे तब्बल दोन तास खैरेंच्या घरी होते.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून आपण मागील तीन टर्मपासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा दानवे यांनी केला होता. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात या मतदारसंघातून खैरे यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले.

यानंतर दानवे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. एवढेच नव्हे तर ते शिंदे गटात प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविणार असल्याचे देखील ऐकायला मिळाले. परंतु दानवे यांनी याबाबत आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगत, सर्व चर्चांवर पडदा टाकला. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी खैरे यांची भेट घेतली नव्हती. आज सकाळी १०.४५ वाजता दानवे यांनी खैरेंच्या येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

Loksabha Election 2024
Harshvardhan Jadhav : ...तर अपक्ष म्हणून लढणार ; हर्षवर्धन जाधव

उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा, पुष्पगुच्छ देत पेढा भरविला. खैरेंनीही आता जुने सगळे सोडून द्या, येथून पुढे आम्ही एकत्र काम करणार असल्याची ग्वाही दानवेंना पेढा भरवत दिली. तब्बल दोन तास निवासस्थानी घालविल्यानंतर दोघेही खैरे यांच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात आले. येथे तब्बल अर्धा तास दोघे एकत्र होते.

निकालानंतर नाराजीबद्दल कळेल!

खैरे आणि दानवे यांचे वाद काही नवीन नाहीत. आजवर नेहमी त्यांच्यात खटके उडत आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीतही अशीच दिलजमाई दोघांमध्ये झाली होती. त्यानंतर लागलेला निकालही शहरवासीयांनी पाहिला. त्यामुळे या भेटीने खरंच दोघांमधील नाराजी मिटली का, हे लोकसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com