Satara Loksabha : साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट? रामराजेंच्या उमेदवारीच्या चर्चेने खळबळ, 'ती' पोस्ट व्हायरल

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत उमेदवारी नाट्य रंगले आहे.
Satara Loksabha Constituency
Satara Loksabha Constituencyesakal
Summary

फलटणचे नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत उमेदवारी नाट्य रंगले आहे. खासदार उदयनराजेंनाच (Udayanraje Bhosale) उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झालेले असतानाच आज अचानक फलटणचे नेते, माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे नाव साताऱ्यासाठी पुढे आल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Satara Loksabha Constituency
'लोकसभेसाठी कऱ्हाड तालुक्यातून 500 उमेदवार देणार'; नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय

पण, खुद्द रामराजेंनी मात्र, मला या मतदारसंघात अजिबात इंटरेस्ट नाही. ही अफवा असून तिचा केवळ आनंद घेत राहा, असे सांगून यावर भाष्य टाळले. सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Constituency) महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीत लढत होणार हे निश्चित आहे; पण उमेदवार कोण हे दोन्ही आघाड्यांनी गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे.

रोज एका उमेदवाराचे नाव पुढे करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. कालपर्यंत खासदार उदयनराजेंनाच तिकीट मिळेल, असे सांगितले जात होते; पण त्यांचा पत्ता कट होऊन हा मतदारसंघच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उदयनराजे यांचे समर्थक आक्रमक झाले व त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उदयनराजेंनाच तिकीट द्यावे, अशी आग्रही मागणी लावून धरत भाजपच्या (BJP) जिल्ह्यातील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली, तसेच भाजपच्या सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका उदयनराजेंच्या समर्थकांनी घेतली, तर मराठा संघटनेनेही उदयनराजेंनी आता स्वत:चा पक्ष काढावा किंवा अपक्ष निवडणूक लढावी, अशी भूमिका घेतली.

Satara Loksabha Constituency
Kolhapur Loksabha : संजय मंडलिकांच्या भविष्याची मुख्यमंत्रीच काळजी घेतील; असं का म्हणाले धनंजय महाडिक?

हे वातावरण शांत होत असतानाच आज फलटणचे नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यामुळे जिल्ह्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे. सध्या रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात त्यांनाच हा मतदारसंघ जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता रामराजेंचे नाव चर्चेत आल्याने खासदार उदयनराजेंचे समर्थक अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Satara Loksabha Constituency
रिलस्टार धनंजय पोवार 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक? शरद पवारांची घेतली भेट, डीपींना पवारांनी दिला 'हा' सल्ला

अफवेचा आनंद लुटा - रामराजे

यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘मला साताऱ्यातून निवडणूक लढण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. ही माहिती चुकीची व अफवा आहे. या अफवेचा आनंद घेत राहा.’’

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com