Vijay Shivtare: शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार; मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला नवा प्रस्ताव

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना धडा शिकवण्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा बालून दाखवली आहे.
Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati
Vijay Shivtare On contesting Lok Sabha Election 2024 from Baramati

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बारामतीतून अजित पवारांना आव्हान देण्यासाठी अद्यापही ठाम आहेत. त्यातच आज त्यांनी आणखी एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या या प्रस्तावाची महायुती कशी दखल घेते हे पाहणं गरजेचं आहे. (Vijay Shivtare ready to fight even on BJP lotus symbol a new proposal was put before the CM Eknath Shinde)

विजय शिवतारे यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं की, महायुतीला विनंती करुन जर शिवसेनेनं बारामतीची जागा मिळवली तर धनुष्यबाण या चिन्हावर आपण ही निवडणूक जिंकू शकतो. गेल्या काही दिवसांत मी मतदारसंघात फिरल्यानंतर लोकांमध्ये अंडर करंट काय आहे, हे मला जाणवलं आहे त्याची माहिती मी वरिष्ठांना दिली आहे. त्यामुळं माझ्यामध्येही एक आत्मविश्वास आला आहे.

मुळात गेल्या दहा-वीस वर्षात बारामतीची जागा महायुतीत भाजपची राहिली आहे. त्यामुळं अगदीच गरज पडली तर मी भाजपच्या कमळ या चिन्हावरही बारामातीतून लढवण्यास माझी हरकत नाही. दोन दिवस मी जे विचारमंथन केलं आहे लोकांशी बोललो आहे त्यावरुन या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे.

अपक्ष हे नंतरचा भाग आला पण कदाचित महायुतीतून अशा पद्धतीनं जर निर्णय झाले तर ते खूपच सोईस्कर होतील. त्यामुळं जर निवडून येण्याच्या मेरिटचा विचार केला तर मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एक एक खासदार निवडून येणं महत्वाचं आहे. त्यामुळं अपक्ष लढणयाऐवजी मी हा देखील ऑप्शन त्यांना दिला आहे. मी याबाबत भाजपच्या नेत्यांशी ही चर्चा केलेली नाही. पण माझे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केलेली आहे, असंही शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com