Loksabha Election Result : मोदी व राहुलही मतदारांना नापसंत !

लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात एकही उमेदवार पसंतीचा नसल्यास ईव्हीएममध्ये नोटाची (यापैकी कुणीही नाही) बटन दाबण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात एकही उमेदवार पसंतीचा नसल्यास ईव्हीएममध्ये नोटाची (यापैकी कुणीही नाही) बटन दाबण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाचा देशातील ६३ लाख ७२ हजार मतदारांनी अवलंब केला असून ही मते जनता दल धर्मनिरपेक्ष, लोकजनशक्ती राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार, आणि ‘एमआयएमआयएम’ या पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी हे खासदारकीसाठी उमेदवार म्हणून नापसंत असल्याचे ईव्हीएममध्ये नोंदविले आहे.

या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या ०.९९ टक्के एवढी आहे. कर्नाटकातील जेडीएसचे दोन खासदार निवडून आलेले आहेत. परंतु त्यांना एकूण मते ०.३४ टक्के मिळाली आहेत. बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे पाच खासदार निवडून आलेले आहेत. परंतु त्यांना मिळालेली मते ही केवळ देशात झालेल्या एकूण मतदानाच्या ०.०२ टक्के एवढीच आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आले आहेत. परंतु त्यांना मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी ०.९२ टक्के येते. या सर्व पक्षांपेक्षा नोटाने अधिक मते मिळविली आहेत.

मध्यप्रदेशातील इंदूर या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली आहे. या मतदारसंघात नोटाला लाख १८ हजार ६७४ एवढी मते आहे. या मतदारसंघात पराभूत झालेल्या बहुजन समाजप पक्षाच्या उमेदवाराला केवळ ५१,६५९ मते मिळाली आहेत.

व्हीआयपी मतदारसंघातही नोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशी मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांना सहा लाख १२ हजार मते मिळाली. याच मतदारसंघात एकही उमेदवार पसंत नसल्याचे सांगणार्यांची संख्या ८,४७८ एवढी आहे.

पंतप्रधान मोदी हे पसंतीचे उमेदवार नसल्याचे वाराणशीतील एवढ्या मतदारांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. याच राज्यातील दुसरा लक्षवेधी मतदारसंघ रायबरेली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहा लाख ८७ हजार मते मिळाली आहेत. या मतदारसंघात नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या ७,८७२ एवढी आहे. राहुल गांधी यांचे मताधिक्य तीन लाख ९० हजार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com