Loksabha Election : काश्‍मीरमध्ये निर्भय वातावरणात मतदान ; श्रीनगर मतदारसंघातील केंद्रांमध्ये पहिल्यांदाच रांगा

काश्‍मीरमध्ये सुमारे ३५ वर्षांत पहिल्यांदाच मतदार कोणत्याही दहशतवादी कारवायांना न घाबरता किंवा बहिष्काराच्या आवाहनाला झुगारून सोमवारी मतदानासाठी बाहेर पडले. मतदान शांततेत पार पडले असून कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

श्रीनगर : काश्‍मीरमध्ये सुमारे ३५ वर्षांत पहिल्यांदाच मतदार कोणत्याही दहशतवादी कारवायांना न घाबरता किंवा बहिष्काराच्या आवाहनाला झुगारून सोमवारी मतदानासाठी बाहेर पडले. मतदान शांततेत पार पडले असून कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही. काश्मीर खोऱ्यात आज पहिल्या टप्प्यात श्रीनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. २०१९ मध्ये कलम ३७० हटविल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील ही पहिलीच निवडणूक आहे.

श्रीनगरमध्ये मतदानाचा वेग मध्यम होता. संपूर्ण मतदारसंघात संध्याकाळी सहापर्यंत सुमारे ३८ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे गंदरबाल जिल्ह्यातील कंगन विधानसभा विभागात सर्वाधिक ४९.४८ टक्के मतदान झाले तर येथील हब्बा कदल विभागात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सर्वात कमी १४.०५ टक्के मतदान झाले होते. बहुतांश मतदान केंद्रांत दोन आणि तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात होती. सुरक्षेच्या कारणास्तव मतदान कर्मचाऱ्यांना आदल्या रात्री मतदान केंद्रांवर थांबण्यास सांगण्यात आले होते.

Loksabha Election
Arvind Kejriwal : ‘नायब राज्यपालच त्यांना हटवू शकतात’

काश्‍मीरमध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. श्रीनगर आणि इतर काही शहरांमध्ये प्रथमच मतदारांच्या रांगा दिसल्या. येथे आतापर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची परंपरा होती. पाळत असत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, राजपोरा, त्राल आणि शोपियाँमध्येही चांगले मतदान झाले. अनेक भागात नवमतदार उत्साहाने मतदान करीत होते. विवाहादिवशीच निवडणूक असल्याने गंदरबालमधील नवरदेवाने नागरी कर्तव्याला प्राधान्य दिले. विवाहाच्या पोशाखात मतदानाला आलेल्या या वराने मतदान केंद्रात सर्वांचे लक्ष वेधले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com