Parliament House : नव्या खासदारांचे स्वागत संसदेच्या मागील इमारतीत;बाह्य भागाचा पुनर्विकास सुरू

नव्या संसदभवन इमारतीच्या बाह्य भागाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत मुख्य इमारतीला लागून असलेल्या मागील इमारतीत होईल. सरकारी सोहळ्यांसाठी नव्या लॉनची निर्मिती करण्याबरोबरच अनेक ठिकाणी नव्या मूर्तीही उभारण्यात येत आहेत.
Parliament House
Parliament Housesakal

नवी दिल्ली : नव्या संसदभवन इमारतीच्या बाह्य भागाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत मुख्य इमारतीला लागून असलेल्या मागील इमारतीत होईल. सरकारी सोहळ्यांसाठी नव्या लॉनची निर्मिती करण्याबरोबरच अनेक ठिकाणी नव्या मूर्तीही उभारण्यात येत आहेत. खासदारांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी तळांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या सगळ्या खासदारांना संसदभवनात फिरविण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यात येईल.

सध्या दिल्लीमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून पहिल्या टप्प्यात त्या सर्वांची विविध राज्यांच्या विश्रामगृहांमध्ये सोय करण्यात येईल. काहींना वेस्टर्न कोर्ट हॉस्टेल कॉम्पलेक्समध्येही ठेवण्यात येईल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही येत्या ४ जून रोजी होत असून त्या दिवशीच्या सायंकाळपर्यंत ही मंडळी दिल्लीमध्ये येणे अपेक्षित आहे. मुख्य संसद भवनाच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीमध्येच भोजनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असून काही वेगळ्या खोल्याही तयार करण्यात आल्या आहेत. मावळत्या खासदारांना अधिकृत सरकारी निवासस्थाने रिकामी करण्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येईल. याच घरांची थोडी डागडुजी आणि रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर ती निवासस्थाने नवनिर्वाचित सदस्यांना देण्यात येतील.

विमानतळे, रेल्वेस्थानकावर स्वागतकक्ष उभारणार

पहिल्या दिवशी खासदारांकडून काही फॉर्म भरून घेण्यात येतील. या सगळ्यांना एक स्मार्टकार्ड दिले जाणार असून त्यासाठी त्यांचे फोटोही काढण्यात येतील. या स्मार्टकार्डच्या आधारेच खासदारांना संसद भवनाची इमारत आणि अन्य कार्यालयांमध्ये प्रवेश मिळेल. दिल्लीतील विमानतळे आणि रेल्वे स्थानकांवर नवनिर्वाचित खासदारांच्या स्वागतासाठी वेगळी स्वागत कक्षेही तयार करण्यात येतील.

खासदारांना हे मिळणार

  • नवे फोन कनेक्शन

  • स्मार्ट ॲक्सेस कार्ड

  • वाहनांना फास्टॅग स्टीकर

  • नवे बँक खाते

  • डिप्लोमॅटिक पासपोर्ट

  • अधिकृत सरकारी मेल

  • सरकारी आरोग्य सेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com