esakal | गोव्याच्या राजकारणात गोवा फाॅरवर्डचे महत्व वाढेलच : विजय सरदेसाई
sakal

बोलून बातमी शोधा

sardesai

गोव्याच्या राजकारणात गोवा फाॅरवर्डचे महत्व वाढेलच : विजय सरदेसाई

sakal_logo
By
प्रशांत शेटये

मडगाव : गोव्यात लोकसभा निवडणूक व तीन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी गोवा फाॅरवर्ड पक्षाचे गोव्याच्या राजकारणातील महत्व तसूभरही कमी होणार नाही, उलट ते वाढतच जाईल, असे सूचक भाष्य गोव्याचे उपमुख्यमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी येथे केले. 

लोकसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक व विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक झाली आहे. लोकसभेच्या जागांसाठी भाजप व काॅंग्रेसमध्ये चुरस आहे. तर पोटनिवडणुकीत भाजप, काॅंग्रेससह मगो व अपक्षही रिंगणात आहे. या निवडणुकांचा निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजुने लागला तरी गोवा फाॅरवर्डचे गोव्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेच, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

फातोर्डा येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. `निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी गोवा फाॅरवर्ड पक्षाचे गोव्याच्या राजकारणातील स्थान कमी होणार नाही.  हा पक्ष मागे नाही तर पुढे जाणारा आहे. आमची ताकद घटणार नाही, ती वाढत जाणार आहे` असे सरदेसाई यांनी सांगितले. 

गोव्यात भाजप प्रणित युती सरकारमध्ये गोवा फाॅरवर्डचा सहभाग असून गोवा फाॅरवर्डचे तीम्ही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश आहे. या पक्षाचे प्रमुख सरदेसाई हे उपमुख्यमंत्री असून कृषी व नगरनियोजन अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. 

loading image
go to top