esakal | Loksabha 2019 : मी कचऱ्यापासून खत बनवतो आणि कमळ फुलवतो : मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

modi

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, प्रकाशसिंग बादल असे मित्रपक्षातील दिग्गज नेते मोदींसोबत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोबत असतील. 

Loksabha 2019 : मी कचऱ्यापासून खत बनवतो आणि कमळ फुलवतो : मोदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वाराणसी : आम्हाला कोणाला हरवायचे नसून जनतेची मनं जिंकायची आहेत, जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत व त्या आम्हीच पूर्ण करणार,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (ता. 26) वाराणसीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. 26) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी देशभरातून एनडीएच्या सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वाराणसीतील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

'देशात सत्तेच्या विरोधात नाही, तर सत्तेच्या बाजूने वातावरण आहे. मोदी देशाची मान कुठेही झुकु देणार नाही, तर तुम्ही भाजपचा झेंडा वाराणसीत झुकु देऊ नका. मी हरेन-जिंकेन, पण बूथ कार्यकर्ता हरला नाही पाहिजे. लोकांच्या शिव्यांचा कचरा माझ्या खात्यात टाका, त्या कचऱ्यापासून मी खत बनवतो आणि कमळ फुलवतो, जनतेच्या आशा-अपेक्षा आमच्यावर आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करणार.' असे मोदींनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना केले. 

नवमतदारांनी नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करा... 
'नवमतदारांना सन्मानपूर्वक वागणूक द्या. गुळाचा एक घास भरवून त्यांचे तोंड गोड करा. ते अठरा वर्ष पूर्ण होऊन देशाचे जबाबदार नागरिक झाले आहेत, याची त्यांना जाणीव करून द्या. सर्व नवमतदारांना नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करायला सांगा व त्यावर सकारात्मक बातम्या वाचण्यासाठी प्रवृत्त करा. तर पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान हे 5 टक्क्याने जास्त व्हायला हवे. प्रत्येकाने मतदानाला नम्रतापूर्वक सामोरे जायला हवे.' असेही मोदींनी सांगितले.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, प्रकाशसिंग बादल असे मित्रपक्षातील दिग्गज नेते मोदींसोबत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोबत असतील. 

मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, 'मेरा बूथ, सबसे मजबूत'चा नारा दिला. 

loading image
go to top