esakal | Losabha 2019 : मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू
sakal

बोलून बातमी शोधा

Losabha 2019 : मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू

'कुली नंबर वन', 'बीबी नंबर वन' असे चित्रपट आले, आता मोदीचा सिमेना येतोय 'फेकू नंबर वन'. जहीर खान 150 च्या स्पीडने बॉलिंग करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात

Losabha 2019 : मोदी म्हणजे 'फेकू नंबर वन' : नवज्योतसिंग सिद्धू

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'कुली नंबर वन', 'बीबी नंबर वन' असे चित्रपट आले, आता मोदीचा सिमेना येतोय 'फेकू नंबर वन'. जहीर खान 150 च्या स्पीडने बॉलिंग करतो, मोदी त्यापेक्षा जास्त स्पीडने फेकतात, अशी टीका सिद्धू यांनी मोदींवर केली. 370 आश्‍वासने दिले, त्यापैकी किती पूर्ण केले हे त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावे, मी हरलो तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आवाहन सिद्धू यांनी यावेळी दिले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ किराडपुरा भागात शनिवारी (ता. 20) सिद्धू यांची सभा झाली. यावेळी त्यांनी 'भाई और बहनों...' असे मोदी स्टाईलने म्हणत त्यांची खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी यांनी 370 आश्‍वासने दिली. तुम्हाला दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या का? गंगा साफ झाली का? 15 लाख रुपये तुमच्या खात्यात आले का? काळे धन आले का? असा प्रश्‍न करत त्यांनी तुम्हाला काय मिळाले 'बाबाजी का ठूल्लू', असे सिद्धू म्हणाले. 'बात करोडो की, दुकान पकोडे की और संगत भगौडो की' असे पंतप्रधानांचे काम असून, नोटबंदी जीएसटीमुळे देशात हाहाकार माजला आहे. 30 हजार कोटीची दलाली केली. आता चौकीदार बनून बाहेरचा पक्ष इथे आणून हे लोक तुमच्यात फूट पाडण्यासाठी आले आहेत. त्यामुळे एकजुटीने मतदान करा, सुभाष झांबड यांचा विजय एक लाख मतांनी निश्‍चित आहे, असा दावा त्यांनी केला.

मोदी तुम्ही 2014 मध्ये गंगेचे लाल बनून आले होते, 2019 मध्ये राफेलचे दलाल बनून जाल, असा दावा सिद्धू यांनी केला. सरकारी कंपन्या मारल्या आणि अंबानींचे तीन लाख 75 हजार कोटींचे कर्ज माफ केले, तुम्ही अंबानींचे केले कॉंग्रेसने 72 हजार कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे सिद्धू म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सीमेवर तणाव का? असा प्रश्‍नही सिद्धू यांनी केला. 

पोटात अन्न नाही, आणि स्वच्छतागृह बनवत आहेत 
केंद्र शासनाच्या योजनांवर टीका करताना सिद्धू म्हणाले, पोटात अन्न नाही, स्वच्छतागृह बनविले जात आहेत. खिशात पैसे नाहीत, बॅंकेत खाते उघडले जात आहे. सगळ्या कंपन्या विदेशी आणि "मेक इन इंडिया' बनविले जात आहे. गावात लाइट नाही आणि डिजिटल इंडिया बनविला जात आहे. डोक्‍यात जातीयवाद आहे आणि "स्वच्छ भारत'ची संकल्पना राबविली जात आहे. 

ठोके ताली... 
आपल्या 18 मिनिटाच्या भाषणात सिद्धू यांनी अनेक पंच मारले. कधी कविता करून तर कधी शेर शायरीने त्यांनी कार्यकर्त्यांची मने जिंकत प्रत्येक वेळी ठोके ताली, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनी देखील टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. 

loading image
go to top