esakal | बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल?
sakal

बोलून बातमी शोधा

evm

बिहार व उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीपूर्वीच ईव्हीएम मशीनची अदलाबदल केली जात असल्याची शंका आहे. सोमवारी (ता. 20) राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनने भरलेला ट्रक पकडला. 

बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी 23 मे ला होईल, त्यापूर्वीच ईव्हीएम मशीनच्या अदलाबदलीच्या घटना वाढत आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीपूर्वीच ईव्हीएम मशीनची अदलाबदल केली जात असल्याची शंका आहे. सोमवारी (ता. 20) राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनने भरलेला ट्रक पकडला. 

सारण व महाराजगंज येथील स्ट्राँगरूममध्ये बेकायदेशीररित्या शिरणारा हा ट्रक राजद-काँग्रेसच्या नेत्यांनी पकडला व त्याला आत जाण्यास रोखले. राजदने ईव्हीएमने भरलेल्या या ट्रकचा फोटो काढत तो ट्विट केला आहे. या ट्रकसोबत तेथील गटविकास अधिकारी होते, पण त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. त्यामुळे या अशा फिरणाऱ्या ट्रकवर प्रश्न उपस्थित राहणे सहाजिक आहे. प्रशासनाचा हा कसला खेळ?, असा सवाल करत ट्विट राजदने केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या उमेदवाराने सांगितले की, या स्ट्राँगरूममध्ये जाणाऱ्या गाड्यांना नंबरप्लेटही नव्हत्या. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी व गटबंधनच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवून धरल्या व आंदोलन केले. दरम्यान उत्तर प्रदेशमधील चंदौली व गाजीपुर येथेही ईव्हीएमच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

loading image
go to top