esakal | Loksabha 2019 : 'सकाळ' वाचकांच्या मते भाजपला बहुमत मिळाले कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

sakals readers opinions about BJP got majority in loksabha election 2019

'भाजपला मिळालेल्या बहुमताची प्रमुख कारणे कोणती?' असा प्रश्न आम्ही आपल्याला केला होता. त्यावर आपली मते आमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. तेव्हा आपल्यापैकी काही थेट उत्तरांना आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत.

Loksabha 2019 : 'सकाळ' वाचकांच्या मते भाजपला बहुमत मिळाले कारण...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लोकसभा 2019
भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या यशापेक्षाही 2019 च्या निकालात भाजपला मिळालेले यश हे मोठे मानले जात आहे. तेव्हा 'सकाळ'च्या वाचकांना लोकसभा 2019 च्या या निकालाबाबत नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपणही आमच्या प्रश्नांना चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व वाचकांचे भरभरुन आभार. 

'भाजपला मिळालेल्या बहुमताची प्रमुख कारणे कोणती?' असा प्रश्न आम्ही आपल्याला केला होता. त्यावर आपली मते आमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. तेव्हा आपल्यापैकी काही थेट उत्तरांना आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत.
 


मुख्य कारण म्हणजे फक्त हिंदुत्व. माझी जीवनातील ही पहलीच लोकसभा निवडणुक होती आणि ते पण फक्त हिंदुत्व या मुद्द्यावर झाली अन् चक्क ते जिंकले पण. रोजगार, विकास, नोटबंदी, जाएसटी ह्यांची काही गरज नसते फक्त 'हिंदू-मुस्लिम' मुद्दा करा आणि निवडणूक जिंका... जसे; भोपाळ लोकसभा...??
- सद्दाम रहेमान खान, दिग्रस जि. यवतमाळ

1.देशभक्तीचा मुद्दा 
2.प्रभावीपणे मांडलेला राष्ट्रीय सुरक्षा
3.जागतिक स्तरावर नेलेला दहशतवादाचा मुद्दा
4.हिंदूत्त्वाचा मुद्दा
5.आक्रमक प्रचार
- मोसिम शिंदा, कोल्हापूर

मोदींच जे व्हिजन आहे ते एकदम नेमकं आहे. मोदी लोकांच्या संपर्कात असतात. भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. मोदींना सामान्य जनतेचा कळवळा आहे.
- प्रकाश गोडगे

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली. विरोधकांची स्वार्थी व बेभरोशाची युती आहे. पाकिस्तान व आतंकवादी यांना त्यांचा जबरदस्त धाक आहे.
- अशोक पुरी

मोदी सरकारकडे असलेला जलद निर्णयक्षमतेचा गुण त्यांना बहुमतात आणण्यात महत्त्वाचा ठरला.
- आकाश देशमुख

विरोधकांकडे एकवाक्यता नव्हती. नेमकं कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची ह्याच भान नव्हतं.
- दिपकराजे गौणकर

ईव्हिएम मशीनमध्ये झालेले बिघाड भाजप सरकारला विजयास कारण ठरले.
- नितीन दुधावडे

विरोधक हे ठाम आणि मजबूत टक्कर देणारे नव्हते.
- मोहसीन सय्यद

loading image
go to top