Loksabha 2019: 'ढाई किलो का हाथ कमल के साथ'

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

- अभिनेता सनी देओलचा भाजपत प्रवेश
- गुरूदासपूरमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत
- पियुष गोयल, निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत प्रवेश

नवी दिल्ली: अभिनेता सनी देओलने आज (ता.23) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याला पंजाबमधील गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत सांगण्यात येत आहेत. केंद्रिय मंत्री पियुष गोयल, केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत सनी देओलने प्रवेश केला.

दरम्यान, सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.

सनी देओल यांनी पंजाबमधून निवडणूक लढवल्यास भाजप मजबूत होईल. सनी देओल यांच्या देशभक्ताच्या प्रतिमेमुळे निवडणूक जिंकण्यास त्यांना चांगलीच मदत होणार आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात अकाली दलासह लढणाऱ्या भाजपला पराभव पत्करावा लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sunny Deol joined BJP