Loksabha 2019 : दहशतवाद्याच्या मृत्यूचे सोनियांना दु:ख : शहा 

पीटीआय
मंगळवार, 23 एप्रिल 2019

बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले.

कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
 
येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून दिलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. प्रज्ञासिंह यांच्याविरुद्धचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बाटला हाउस चकमक यूपीए सरकारच्या काळात झाली. या चकमकीत दहशतवादी मारल्यानंतर सोनिया गांधी यांना दु:ख झाले. मात्र, याच चकमकीत हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांबद्दल त्यांना काहीही वाटले नाही. कॉंग्रेसने या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला हवे.

शहा म्हणाले की, बांगलादेशातून जे हिंदू, बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्‍चन कोणत्याही धर्माचे निर्वासित असोत; त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल आणि तसा उल्लेख जाहीरनाम्यात आहे. यासंदर्भात नागरी संशोधन विधेयक अधिवेशनात आणले जाईल आणि त्यानुसार परदेशातील स्थलांतरितांना नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यानंतर एनआरसी आणले जाईल. निर्वासितांनी काळजी करण्याची गरज नाही. केवळ घुसखोरांनी घ्यायला हवी. एनआरसी केवळ बंगालसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये केवळ भाजपच सरस्वतीपूजा आणि दुर्गापूजेचे आयोजन सन्मानाने करू शकतो, असेही शहा म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Criticizes Soniya Gandhi on batla house encounter Issue